Zebra crossings and speed breaker
Zebra crossings and speed breaker 
पुणे

‘सकाळ’च्या वृत्तानंतर पुण्यातील 'या' चौकात झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक

सकाळ वृत्तसेवा

पुणे-   सिंहगड रस्ता - पानमळा येथील प्रलंबित असलेला झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधकाचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, तेथे दोन्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ‘सकाळ’ने याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेऊन कार्यवाही केली.

पानमळा परिसरातील साथी किशोर पवार चौक मृत्यूचा सापळा बनला असून, तेथे सिग्नल तसेच झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची वाहनचालकांची मागणी होती. 

माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांनी यासंदर्भातला पत्रव्यवहार महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे केला होता; मात्र तरीही येथे कुठलीही यंत्रणा कार्यरत झाली नव्हती. त्याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. त्यानंतर येथे झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक तयार करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.

दत्तवाडी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दरेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेऊन या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. असे असले तरी येथे लवकरच सिग्नल यंत्रणादेखील कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होत होता. वाहतूक नियमन नव्हते. ‘सकाळ’ने हा प्रश्न उठविल्यामुळे येथे गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले.
- गुणवंत म्हस्के, नागरिक 

पानमळा परिसरातील साथी किशोर पवार चौकात गतिरोधक बसवले असले, तरी या भागात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.
- मुस्तफा शेख, नागरिक 

या भागात विविध ठिकाणचे रस्ते एकत्र येतात. येथे दोन पंक्चर आहेत. त्यातील एक पंक्चर बंद करण्यात आला आहे, त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली. गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग झाले असून, लवकरच सिग्नल यंत्रणादेखील कार्यान्वित होणार आहे.
- विठ्ठल दरेकर, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT