Zendu Flower sakal
पुणे

Zendu Flower : झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्याचा हिरमोड

दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.

डी. के. वळसे पाटील

मंचर - दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. २३) प्रती किलो २५ ते तीस रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना व ३५ ते ४० रुपये बाजारभावाने झेंडूची फुले ग्राहकांना मिळाली. फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

आंबेगाव तालुक्यात फुलशेतीसाठी पोषक हवामान व शेतजमीन आहे. शेवंती, झेंडू, गुलाब, आस्टरची फुलेशेती करणारे अनेक शेतकरी येथे आहेत. गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात फुले पुणे व मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात.

'गेल्या वर्षी ग्राहकांना ८० ते १०० रुपये किलो या बाजारभावाने झेंडूच्या फुलांची खरेदी करावी लागली होती. त्यावेळी शेतकर्याना सरासरी ७० रुपये बाजारभाव मिळाला होता. यावेळी फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलाचे पिक घेतले आहे. सोमवारी नारायणगाव, घोडेगाव, तांबडेमळा, अवसरी खुर्द, गावडेवाडी, लांडेवाडी आदी गावातून टेम्पोतून जवळपास २५ टन फुलांची आवक मंचरला झाली.

अनेक शेतकऱ्यांनी येथे फुलांची विक्री केली. दीपावलीपर्यंत असेच दर राहण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्च व बाजारात मिळणारा भाव पाहता फुलउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. प्रती किलो शेवंतीला १०० ते १२० रुपये, अॅस्टरला १०० रुपये, गुलछडी १०० रुपये असे बाजारभाव होते.' अशी मंचर येथील फुल विक्रेते रतन निघोट व सचिन भोर यांनी दिली.

दरम्यान आंबेगाव तालुक्यातून नवी मुंबई बाजारपेठेत टेम्पोतून विक्रीसाठी पाठविलेल्या झेंडू पिकांना प्रती किलो दहा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला. आवक मोठ्याप्रमाणात झाल्याने बाजारभाव कोसळल्याचे नवी मुंबई येथील फुलांचे व्यापारी प्रतिक पडवळ (मुळगाव म्हाळुंगे पडवळ, ता.आंबेगाव) यांनी सांगितले.

'वीस गुंठे क्षेत्रात झेंडू पिकाचे उत्पादन घेतले आहे. चार दिवसापूर्वी प्रती किलो झेंडूला ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळाला होता. दसरा सणामुळे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा होती. पण अपेक्षा भंग झाला. सोमवारी (ता.२३) २५ ते ३० रुपयांनी व्यापाऱ्यांनी खरेदी केली. त्यामुळे मोठी निराशा झाली.'

- पांडुरंग भोर, फुल उत्पादक शेतकरी, तांबडेमळा (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT