पुणे

अपघात रोखण्यासाठी ‘झिरो डेथ कॉरिडॉर’

CD

आळेफाटा, ता. २० : पुणे- नाशिक आणि अहिल्यानगर- कल्याण महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आळेफाटा पोलिसांनी ‘झिरो डेथ कॉरिडॉर’ मोहीम हाती घेतली आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी महामार्ग अधिकाऱ्यांसोबत बुधवारी (ता. २०) विविध अपघातप्रवण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून ठोस उपाययोजनांचा आराखडा तयार केला.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, विनोद जाधव, प्रल्हाद आव्हाड आणि रस्ते बांधणी अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर- कल्याण मार्गावरील पेमदरा, गुळुंचवाडी, बेल्हे, गुंजाळवाडी, राजुरी तसेच पुणे- नाशिक मार्गावरील पिंपळवंडी, चाळकवाडी टोलनाका, वडगाव आनंद आणि आळेखिंड या भागांची पाहणी केली. यावेळी धोकादायक वळणे आणि अनधिकृत कट बंद करणे, हायमास्ट दिवे बसवणे, रंबल स्ट्रिप्स, वेग नियंत्रण फलक आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्ता मार्किंग स्पष्ट करणे आणि आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला. केवळ अपघातानंतरचा पंचनामा नको, तर अपघात होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची असल्याचे विश्वास जाधव यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT