कॅम्पस ः छत्रपती संभाजीनगर
शीतकक्ष उभारणीचे प्रात्यक्षिक
---------------
कांचनवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर ः सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाडळी (ता. पैठण) येथे शून्य ऊर्जा शीतकक्ष उभारणीविषयी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. शेतमाल आणि भाजीपाला हे नाशवंत असल्यामुळे काढणीपश्चात योग्य साठवणुकीअभावी त्यांचे नुकसान होते. अशावेळी छोट्या शेतकऱ्यांसाठी शून्य ऊर्जा शीतकक्ष या अत्यंत प्रभावी आणि स्वस्त पर्याय ठरतो. याच अनुषंगाने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाडळी गावातील नानासाहेब भांडे त्यांच्या शेतामध्ये शीतकक्ष उभारणीचे प्रात्यक्षिक सादर केले.
या शीतकक्षाची उभारणी सहज उपलब्ध होणाऱ्या विटा, वाळू आणि गोणपाटाच्या साह्याने करता येते. यासाठी कोणत्याही प्रकारची वीज किंवा इंधनाची आवश्यकता नसते. हे तंत्रज्ञान पाण्याच्या बाष्पीभवनावर तंत्रज्ञानावर काम करते. यामध्ये बाहेरील तापमानापेक्षा साधारण १० ते १५ अंश सेल्सिअस कमी तापमान आणि ९० टक्के हून अधिक आर्द्रता राखली जाते. त्यामुळे शेतमाल काढणीनंतर होणारे खराब होऊन होणारे नुकसान टाळणे शक्य होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता कृषी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, डॉ. श्रीकांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. प्रात्यक्षिकाचे आयोजन चंचल कोकाटे, ऋतुजा सांगळे, श्रुती मगर, सलोनी कवारे, मनीषा मोरे, अनुजा मच्छी, प्राची मंगल पवार, गीता केकान, वैष्णवी राठोड, वैष्णवी गुडला, तनवी साठे, श्रीनिवास शिंदे, विवेक बणजगोळे, वेदांत हिंगमिरे, स्वराज नांदेड यांनी केले. यावेळी कृषिमित्र राजू हुड, राम बांडे, शिवाजी श्रीधर हुड, कैलास हुड, रामभाऊ रहाटवाडे, सरताना बानो सय्यद, ओमकार बांडे, महेश हुड, मारुती बांडे, हरिभाऊ बांडे, ज्ञानेश्वर बांडे, सुभाष बांडे, कृष्ण दिसगाज यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो ः
कांचनवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर ः सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाडळी (ता. पैठण) येथे शून्य ऊर्जा शीतकक्ष उभारणीविषयी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.
PNE26W40071
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.