Zero Shaddow Day sakal
पुणे

Zero Shaddow Day : पुणेकरांनी अनुभवला ‘सावली नसलेला दिवस’

शनिवारी पुणे शहर व परिसरात सकाळपासूनच आकाश निरभ्र असल्याने अनेक खगोलप्रेमी संस्था आणि नागरिकांनी हा विलोभनीय अनुभव घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शनिवारी दुपारी १२ वाजून ३१ मिनीटे झाली अन् पुणेकरांच्या पायाजवळी सावली चक्क नाहिशी झाली. बरोबर डोक्यावर आलेल्या सूर्यामुळे वस्तूंसह सर्वच प्राण्याची सावली काही वेळा साठी दिसेनाशी झाली. खगोलीय भाषेत याला सावली नसलेला दिवस अर्थात झीरो शॅडो डे असे म्हटले जाते. रविवारी (ता.१४) सुद्धा नागरिकांना हा दिवस अनुभवता येणार आहे.

दरवर्षी १३ आणि १४ मे रोजी पुणे शहर आणि परिसरात हा सावली नसलेला दिवस अनुभवता येतो. शनिवारी पुणेकरांनी हा दिवस अनुभवला आता रविवारी (ता.१४) पिंपरी चिंचवडकरांसह देहू, तळेगाव दाभाडे, लोणावळा ते अगदी अलिबाग पर्यंतच्या नागरिकांना हा दिवस अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येणार आहे.

शनिवारी पुणे शहर व परिसरात सकाळपासूनच आकाश निरभ्र असल्याने अनेक खगोलप्रेमी संस्था आणि नागरिकांनी हा विलोभनीय अनुभव घेतला. अनेकांनी समाजमाध्यमांवर सावली नसलेल्या दिवसाचे छायाचित्रे आणि माहिती देणारे संदेश टाकले. उद्याही काही प्रमाणात नागरिकांना या सावली विरहीत दिवसाचा अनुभव घेता येईल.

खगोलीय पार्श्वभूमी -

सूर्याच्या उत्तरायण किंवा दक्षिणायनादरम्यान ज्या अक्षांशाच्या आकाशातून त्याचा प्रवास होतो, त्या अक्षांशावरील शहरांमध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान सूर्याची किरणे थेट लंबरूप पडल्यामुळे काही काळ सावली नाहीशी होण्याची घटना अनुभवायला मिळते. सूर्याने २२ मार्च रोजी विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धाच्या आकाशात प्रवेश केला असून, २१ जून रोजी तो सर्वोच्च बिंदूवर म्हणजेच २३.५ उत्तर अक्षांशांवर (कर्कवृत्त) पोचेल.

दोन दिवस ‘शून्य सावली’ -

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून २३.५ अंशानी कललेला आहे. दोन असे दिवस येतात की, मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. तसेच सूर्य दररोज ५० अंश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. अथवा काही वेळासाठी ती नाहीशी होते.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगवेगळे दिवस आणि वेळा असतात.

राज्यातील सर्व शहरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येणार आहे. राज्यात येत्या ३ मे पासून ३१ मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. पिंपरी चिंचवड शहवासीयांनी रविवारी (ता. १४) दुपारी १२ः२० ते १२ः३५ या वेळे दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. जेणेकरुन तुम्हाला शून्य सावली दिसू शकते.

- सुनिल पोटे, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT