पुणे

सावली झाली पायांखाली गडप (व्हिडिओ)

नीला शर्मा

पुणे - काल दुपारी बरोबर बारा वाजून एकतीस मिनिटांनी आपली सावली पायांखाली गडप 
झालेली मुलांनी पाहिली. 'भारतीय विज्ञान शिक्षा एवम् अनुसंधान संस्थान'(आयसर)मध्ये जमलेल्या मुलांनी यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत हा आगळावेगळा अनुभव घेतला. 

तेरा मे व तीस जुलै या दोन दिवशी आपण उन्हात उभे असल्यास बरोबर बारा वाजून एकतीस मिनिटांनी पायाखालची सावली गडप होते, ही माहिती ऐकून मुलं चकित झाली. या संस्थेतील 'श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर'चे समन्वयक अशोक रूपनेर, कनिष्ठ शिक्षण सहायक नेहा देशपांडे व श्रद्धा भुरकुंडे यांनी सांगितले , " सूर्य माथ्यावर आला असा वाक्प्रचार असला तरी तो दररोज नेमका माथ्यावर नसतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. शून्य अंशावर असलेल्या विषुववृत्तापासून कर्कवृत्त तेवीस पूर्णांक पाच अंश इतक्या कोनात उत्तरेकडे व मकरवृत्त तेवढ्याच कोनात दक्षिणेकडे आहे. प्रत्येक शहर किंवा गावाच्या बरोबर माथ्यावर सूर्य वर्षातून दोनदा येण्याची तारीख व वेळ ही या कोनावर अवलंबून असते. एरवी माथ्यावर वाटणारा, पण प्रत्यक्षात काहीसा तिरका असलेला सूर्य पुण्यात काल बरोबर माथ्यावर होता. त्यामुळे सावली पायांखाली लपत होती. एक ते दोन दिवस आधी व नंतर साधारण तीच स्थिती अनुभवता येते. आज मुंबईतला 'झिरो शॅडो डे' म्हणजे सावली गडप होण्याचा दिवस. "

आयसरच्या प्रांगणात जमलेल्या मुलांनी निरनिराळ्या आकार व उंचीच्या वस्तू वेगवेगळ्या पातळ्यांवरील पृष्ठभागावर ठेवत सावली गडप होण्याची तसंच थोडीशी दिसण्याची गंमत अनुभवली. सुट्टीच्या काळात रोज त्याच वेळी  सावली लहान होते की मोठी, हे पाहण्याचं या मुलांनी ठरवलं. सकाळी व संध्याकाळी सावली लहान - मोठी दिसते का आणि ती कुठल्या दिशेला पडते याचं निरीक्षण आम्ही करणार आहोत, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT