पुणे

‘झेप युवा करिअर महोत्सव’ युवांच्या भविष्यासाठी दिशादर्शक उपक्रम : भावना मेळवणे

CD

करिअरच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे

भावना मेळवणे; झेप युवा करिअर महोत्सवात मार्गदर्शन

सातारा, ता. ३० ः युवांनी बदलत्या काळानुसार आपल्या आवडी, कौशल्ये आणि क्षमतांचा योग्य विचार करून करिअरची दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच आजच्या काळातील एआय तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि नव्या करिअर संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत भावना कॉलेज ऑफ इंटिरियर डिझाईनच्या प्राचार्या भावना मेळवणे यांनी व्यक्त केले.
‘झेप युवा करिअर महोत्सव २०२६’ मध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. शिक्षण क्षेत्रातील विविध संधी, योग्य करिअर निवडीचे महत्त्व आणि भविष्यातील बदलत्या कौशल्यांची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
ॲनिली ॲकॅडमी आणि स्वयंसिद्धा महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव केबीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झाला. ‘युवांसाठी एआय, कौशल्य आणि भविष्याची ओळख’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि भविष्यातील बदलत्या कार्यक्षेत्रांची माहिती मिळाली.
महोत्सवामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्स यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
ऋतू शिंदे आणि शगुन साळुंखे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारण्यात आला.
-----------------------
62641
सातारा ः झेप युवा करिअर महोत्सवात भावना मेळवणे यांचे स्वागत करताना मान्यवर.
..........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT