जिल्ह्यातील ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वाधिक १९ गावे हवेली तालुक्यातील असून, सर्वांत कमी म्हणजेच केवळ एक गाव आंबेगाव तालुक्यातील आहे.
पुणे Zika virus most vulnerable villages : जिल्ह्यातील ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वाधिक १९ गावे हवेली तालुक्यातील असून, सर्वांत कमी म्हणजेच केवळ एक गाव आंबेगाव तालुक्यातील आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या गावांची यादी शुक्रवारी (ता.६) जाहीर केली. (Pune Latest Marathi News)
झिका डेंगी व चिकुनगुनियासदृश आजार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागील तीन वर्षांत सातत्याने डेंगी व चिकुनगुनिया या आजारांचा उद्रेक झालेली गावे ही झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी या बाबत काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे पुढीलप्रमाणे
जुन्नर : आनंदवाडी, ओतूर, येणेरे, राजुरी, पिंपळवंडी, काळदरी.
खेड : राजगुरुनगर शहर, पांडूरंगनगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकरवाडी, गोसासी.
आंबेगाव --- : घोडेगाव.
शिरूर : वढू बुद्रूक, मांडवगणफराटा, गारमाळ, सादलगाव.
दौंड : दौंड शहर, समतानगर, होलारवस्ती, कुरकुंभ, हिंगणी बेर्डी.
इंदापूर : निमगाव केतकी, शेळगाव, यादववाडी, कुरवली, माळवाडी, तक्रारवाडी, भादलवाडी.
हवेली : देहू, नांदेड., नऱ्हे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, खानापूर, मणेरवाडी, खेड, वाघोली, कोळवडी, मांजरी बुद्रूक, केशवनगर, उरुळीकांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, खामगाव टेक, पिंपरीसांडस, थेऊर.
वेल्हे : करंजावणे, खामगाव क्षेत्र, ओसाडे, साखर, आंत्रोली.
मुळशी : माण, सूस.
बारामती : तरडोली, सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, सटवाजीनगर, अंबराई, आनंदनगर, तांदूळवाडी, माळेगाव विद्यानगर, सूर्यनगरी, कटफळ.
पुरंदर : सासवड, ढुमेवाडी, पारगाव, नीरा, सुपे खुर्द, बेलसर, जेजुरी.
भोर : भुतोंडे, चिखलावडे, वाठार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.