Zilla Parishad school teachers also started online classes  
पुणे

जिल्हा परिषद शाळेच्याशिक्षकांनीही कसली कंबर; असा' घेतायेत विद्यार्थ्यांचा अभ्यास

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा लगेच सुरू होणार नाहीत. त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. या शाळांच्या तुलनेत आपले विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनीही कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून, मोबाईलवर अभ्यास देऊन, पालकांच्या मदतीने स्वयंअध्ययन कसे करावे याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा लवकर भरणे शक्य नाही. त्यामुळे सध्या अनेक शाळांनी विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. त्यातूलनेत आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, त्यांचा अभ्यास सुरू राहावा यासाठी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकही प्रयत्नशील आहेत. सध्या लवकर शाळा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक  जिल्हा परिषद शाळांमध्ये पालकांना बोलावून त्यांच्या पाल्यांना (विद्यार्थ्यांना) पुस्तके वाटप करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रोजचा अभ्यास देतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घरी पालकांच्या साहाय्याने स्वयंअध्ययन करण्याबाबतही शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"शाळा सुरू झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांचा घरी राहून अभ्यास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर रोजचा अभ्यास व्हिडीओ आणि पीडीएफ फाईलद्वारे पाठवला जातो. तसेच विद्यार्थ्यांना पालकांच्या साहाय्याने स्वयंअध्ययनावर भर देण्यास सांगितले आहे," असे अनेक शिक्षकांनी सांगितले.

"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे मुलांना घरी मोबाईलवर अभ्यास दिला जात आहे, हा नक्कीच चांगला प्रयत्न आहे. त्यामुळे मुलांनी घरी अभ्यास सुरू केल्याने त्यांचा अभ्यास मागे राहणार नाही," असे अनेक पालकांनी सांगितले.  


विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पालकांना पाहिजे अँड्रॉईड मोबाईल
शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यास आणि अभ्यासाचे व्हिडीओ पालकांच्या मोबाईलवर व्हाट्सअपद्वारे पाठवितात. परंतु जिल्हा परिषद शाळांतील अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉईड मोबाईल नाही. अशा विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाच्या पीडीएफ प्रती देण्यात येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

Nainital Travel: ऑफ सीजन बनला सुपरहिट! पावसाळ्यात नैनीतालमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी, स्थानिकांची कोट्यवधींची उलाढाल

Team India Selection:भारतीय संघात श्रेयवादासाठी चढाओढ! गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यावरही 'ती' दोघं ठरतायेत वरचढ; Inside News

SCROLL FOR NEXT