पुणे

क्रिप्टोकरन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणांना लुटले

CD

पुणे, ता. १४ ः विमानतळ परिसरातील झिरकॉन सोसायटी भागात मंगळवारी मध्यरात्री दोन तरुणांना शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. यूएसडीसी कॉईन्स ही क्रिप्टोकरन्सी देण्याच्या बहाण्याने आरोपींनी दोन तरुणांना बोलावून घेतले आणि त्यांना मारहाण करून अडीच लाखांहून अधिक ऐवज लंपास केला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी प्रणय अमर बुवा (वय १९, रा. धानोरी, विश्रांतवाडी) याला अटक केली असून, त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हडपसर येथील १८ वर्षीय तक्रारदार मुलगा आणि त्याचा नातेवाईक दीड लाखाची रोकड घेऊन झिरकॉन सोसायटी परिसरात गेले होते. तिथे आरोपींनी कॉईन्स देण्याऐवजी दोघांना बेदम मारहाण केली. आरोपींनी एक लाख ४० हजारांची रोकड, दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT