Bit Marshal_Dilivery boy
Bit Marshal_Dilivery boy 
पुणे

पुणे : बाईक चालवताना डिलिव्हरी बॉयला आली फीट; बीट मार्शलमुळे टळलं संकट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मंगळवारी रात्री दहा वाजताची वेळ. नारायण पेठेतील माती गणपती मंदिर परिसरात झोमॅटो कंपनीचा डिलीव्हरी बॉय दुचाकीवरुन खाली रस्त्यावर पडला होता. याची खबर मिळताच अवघ्या काही मिनिटांत विश्रामबाग पोलिस ठाण्याचे बीट मार्शलला त्याच्या मदतीला घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या वाहनातून या तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर डिलीव्हरी बॉयच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. कठीण प्रसंगात मदत केल्याबद्दल तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांप्रती कृतज्ज्ञता व्यक्त केली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात १५ मेपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे बहुतांश नागरीक घरात राहूनच त्यांची कामे करीत आहेत. मात्र एकटे राहणारे किंवा कुटुंबासाठी थोडासा वेगळेपणा म्हणून हॉटेलातील खाद्यपदार्थ मागविण्याकडे नागरीकांचा कल आहे. अशा नागरीकांना सेवा पुरविण्याचे काम विविध कंपन्यांचे डिलीव्हरी बॉय करीत आहेत. कित्येक तास हॉटेल, रेस्टॉरंटस्‌च्या बाहेर किंवा परिसरात उभे राहून, जेवणाचे पार्सल घेतल्यानंतर ते वेळेत ग्राहकापर्यंत पोचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. अशाच प्रकारे गोखलेनगरमधील कुसाळकर चौकातील ३५ वर्षीय रविंद्र गंभीरे हे झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीमार्फत नागरीकांना जेवणाचे पार्सल पुरविण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गंभीरे नारायण पेठेतून दुचाकीवरुन जात असताना अचानक खाली पडले. त्यावेळी तेथे काही नागरीक पोचले. मात्र ,त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.

दरम्यान, ही खबर परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्यापर्यंत पोचली. त्यांनीही त्याची गांभीर्याने दखल घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांना संबंधीत व्यक्तीला मदत करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार, टिकोळे यांनी नारायण पेठेत गस्तीवर असणारे बीट मार्शल पोलीस शिपाई योगेश एकशिंगे, पोलीस नाईक राजेंद्र ढोरजकर यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. दोघेही घटनास्थळी पोचले, तेव्हा तरुणाजवळ त्याचे मामा थांबले होते. तरुणाला फीट आली असून त्यास तत्काळ उपचारासाठी दाखल करण्याची विनंती त्यांच्या मामाने पोलिसांकडे केली. त्यावेळी एकशिंगे व ढोरजकर यांनी क्षणाचाही विलंब न करता गंभीरे यांना वडारवाडी येथील ओम साई रुग्णालयात दाखल केले. डॉ. कुलकर्णी यांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले. तासभर आराम केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले. त्यावेळी गंभीरे यांची आई, मामा यांनी पोलिसांनी वेळीच धाव घेऊन केलेल्या मदतीबद्दल कृतज्ज्ञता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT