पुणे

एमसीए निमंत्रित क्रिकेट

CD

फोटो ः विराज बेलदरे

झोरास्ट्रियन क्लबचा हिंगोली संघावर डावाने विजय एमसीए निमंत्रित क्रिकेट

पुणे, ता. १० ः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या एमसीए निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत झोरास्ट्रियन क्लबने हिंगोली संघाचा एक डाव १९४ धावांनी दणदणीत पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा विराज बेलदरेची शतकी खेळी आणी क्षितिज मोरगांवकरने केलेल्या अचूक गोलंदाजीचा होता.
नाशिक येथे झालेल्या दोन दिवसीय सामन्यात झोरास्ट्रियन क्लबने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद ३४९ धावांवर डाव घोषित केला. यावेळी विराज बेलदरेने ११८ चेंंडूत २३ चौकारांच्या साहाय्याने १२८ धावांची तर क्षितिज मोरगावकरने ४९ चेंडूत आठ चौकार व दोन षटकारासह नाबाद ६७ धावांची खेळी केली. शिवतेज तावरेने दोन गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना हिंगोली संघाचा पहिला डाव ६४ धावांत आटोपला. रोशन शिरभातेने चार तर क्षितिज मोरगांवकर व उत्कर्ष भोसलेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. झोरास्ट्रियन संघाने पहिल्या डावात २८५ धावांची मोठी आघाडी मिळवली. फॉलोऑॅनच्या नामूष्कीनंतर हिंगोली संघाचा दुसरा डावही ९१ धावांत गुंडाळला गेला. यावेळी क्षितिज मोरगांवकरने चार तर रोहन शिरभातेने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः
झोरास्ट्रियन क्लब - पहिला डाव - (५५ षटकांत) ५ बाद ३४९ घोषित (विराज बेलदरे १२८, क्षितिज मोरगांंवकर नाबाद ६७, महेश चौधरी ३३, रोहन शिरभाते नाबाद २६, ओम भगत २१, ध्रुव कोंढरे २१, शिवतेज तावरे २-६७, वेद पुरोहित १-३३, शशिकांत चव्हाण १-३९, भाविक रणखांबे १-४८) विजयी विरुद्ध हिंगोली संघ - पहिला डाव - (३२.४ षटकांत) सर्वबाद ६४ (रोशन शिरभाते ४-२०, क्षितिज मोरगांवकर २-४, उत्कर्ष भोसले २-७, विराज बेलदरे १-१०) आणी दुसरा डाव - (३०.५ षटकांत) सर्वबाद ९१ (श्‍लोक जाधव २१, क्षितिज मोरगांवकर ४-,२८, रोहन शिरभाते २-१८, विराज बेलदरे १-७, उत्कर्ष भोसले १-२५)
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT