The ZP schools are still started in City due to a lack of written orders from the Education Department 
पुणे

शिक्षण विभागाकडून लेखी आदेश न मिळाल्याने शहरालगतच्या शाळा सुरुच

निलेश बोरुडे

किरकटवाडी(पुणे): कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लागून असलेल्या परंतु महानगरपालिका हद्दीबाहेर असलेल्या सर्व शाळा व महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेले असताना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून आदेश न आल्याने शहरालगतच्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा व इतर महाविद्यालये सुरू आहेत.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोणा आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषद यांच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली. याच धर्तीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून असलेल्या अधिकारांचा उपयोग करून पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोणा आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिका हद्दीबाहेर असलेल्या परंतु शहराला लागून असलेल्या ग्रामीण हद्दीतील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आवश्यक ते आदेश न आल्याने शहरालगतच्या सर्व शाळा व महाविद्यालये सुरु असल्याचे दिसत आहे.

Corona Virus : अफवा पसरविणाऱयां दोघांविरोधाात पुण्यात पहिला गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही जिल्हा परिषदेकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व  पालकांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर,"नांदेड, किरकटवाडी व खडकवासला याबरोबरच शहरालगतच्या इतर गावांतील शाळा व महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे", असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

खंडणी प्रकरण : छोटा राजनच्या पुतणीचा दुसरा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात


पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता,"हद्दीलगतच्या गावांमधील शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्याबाबत आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात अनेक मोठी गावे आहेत व खेडेगावांमध्ये असणाऱ्या शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक शहरी भागातूनच ये-जा करत असल्याने अशा ठिकाणीही सुट्टी देण्याबाबत विचार सुरू आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे. शिक्षक व पालक संघटनांनी याबाबत मागणी केली आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
CoronaVirus : गजबजलेल्या तुळशीबागेत आता फक्त शुकशुकाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT