पुणे

जिल्हा परिषद शाळांचे ऑडिट

CD

ऑडिट झेडपी शाळांचे : निधी उपलब्धतेवर अडले घोडे, नुसत्याच बैठकांना जोर
शाळांमध्ये वीज, पाणी, स्वच्छतागृहास असणार प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३०

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता व त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या २७९२ शाळांची पाहणी करून अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली जाणार आहे. पण धोकादायक खोल्या असलेल्या शाळांचे ऑडिट करण्याबाबत निधीची तरतूद नसल्याने घोडे अडले आहे. याबाबत जिल्हा परिषद सेसमधून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात ऑडिटला मुहूर्त मिळणार आहे.

एकीकडे जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक खोल्या पाडण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना असलेले अधिकार तर दुसरीकडे ऑडिटसाठी पुरेसा निधी नसल्याने धोकादायक खोल्यांची निश्चित संख्या समोर आली नाही. अशातच शासनाने शाळांची पाहणी करून सुविधा उपलब्धतेबाबत अ, ब, क, ड वर्गवारी करण्याचे फर्मान काढले आहे. यामध्ये शाळांमध्ये मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहे का, असेल तर वापरण्यायोग्य आहे का, पिण्याचे पाणी नियमित आहे का, ते पिण्यायोग्य आहे का, वर्गखोल्या पुरेशा, सुरक्षित व सुव्यवस्थित आहेत का, वीज वीज जोडणी व व्यवस्था उपलब्ध आहे का, शाळा व परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी इमारत व परिसर सुरक्षित आहे का याची माहिती अ, ब, क, ड मध्ये भरण्यात येणार आहे.

त्या १.८३ कोटींचे काय केले...
महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शाळांच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून १ कोटी ८३ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी शाळांच्या दुरूस्तीवर खर्च करणे अपेक्षित असताना अद्यापही हा निधी खर्च झाला नाही. याबाबत संबंधित अधिकारी वा पदाधिकारी जाब विचारत नाही. जेव्हा एखादी दुर्घटना होते, तेव्हा त्यावर बैठकांवर बैठका होतात, सभेत चर्चा होते पण प्रत्यक्षात शाळांची दुरूस्ती का झाली नाही, निधी खर्च न होण्याची जबाबदारी कोणाची याचे उत्तर मिळत नाही.

कोट....
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत मूलभूत सुविधांचा अभाव किंवा त्या अपुऱ्या असलेल्या शाळा व मूलभूत सुविधांची कमतरता असलेल्या व उपाययोजनांची गरज असलेल्या शाळा याची यादी करण्याच्या सूचना दिल्या. अशी यादी तालुकास्तरावर तयार केली असून जिल्ह्याची एकत्रित यादी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, पुरेशा व सुव्यवस्थित वर्गखोल्या आणि वीज व्यवस्था या बाबींवर अधिक भर दिला जाणार आहे.
- विशाल मुळे, शिक्षणाधिकारी.

----------पूर्ण---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील महापुरात देवदूत बनून आली म्हैस, तरुणाचा वाचवला जीव; हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरीही भावूक

Ranjangaon Drunk Driving: रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्यावर मद्यधुंद पिकअप चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT