पुणे

हेड तीन दिवसांमध्ये माफी मागा

CD

नवी दिल्ली, ता.५ (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून हटविल्याप्रकरणी संसदीय समितीने ‘मेटा’चे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना तीन दिवसांमध्ये माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. झुकरबर्ग यांनी माफी न मागितल्यास त्यांना दिलेले कायदेशीर संरक्षण काढून घेण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे. प्रसंगी झुकेरबर्ग यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही या समितीने म्हटले आहे.
लोकसभा सचिवालयाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ पाच ते सहा तासांसाठी फेसबुकवरून हटविण्यात आला होता. ही बाब समितीने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीने या मुद्द्यावर झुकरबर्ग यांच्याकडून बिनशर्त माफीची मागणी केली आहे. तीन दिवसांत माफीनामा मिळाला नाही तर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९(३) अंतर्गत मिळणारे संरक्षण काढून घेतले जाईल आणि त्यांच्यावर ‘प्रकाशक’ म्हणून कारवाई केली जाईल, असे समितीने म्हटले आहे.


प्रतिक्रिया
झुकेरबर्ग यांनी माफी मागितली नाही तर त्यांचे कायदेशीर संरक्षण काढून घेण्यात येईल. आक्षेपार्ह पोस्टमुळे ‘मेटा’च्या प्रमुखांविरोधात देशभरात गुन्हे दाखल होतील, त्यांना तुरुंगामध्येही जावे लागेल. याशिवाय, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि महिलांचा अवमान करणारे साहित्य न हटवणाऱ्या प्लॅटफॉर्मवरही कारवाई करण्याचा विचार आहे.
- निशिकांत दुबे, संसदीय समितीचे अध्यक्ष

- गुंतवणूकदारांची ४८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या अॅपप्रकरणी ‘गुगल इंडिया’च्या प्रमुखांवरही कारवाई करण्याचे निर्देश समितीने केंद्र सरकारला दिले आहेत. या प्रकरणामध्ये हैदराबाद सायबर पोलिसांनी यापूर्वीच ‘गुगल इंडिया’च्या प्रमुखांना सहआरोपी केले आहे.

- ‘मेटा’च्या जागतिक पथकाने बुधवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तांत्रिक चुकीमुळे हा व्हिडिओ हटवला गेल्याचे स्पष्टीकरण ‘मेटा’ने दिले असले तरी, सरकारने हे स्पष्टीकरण अपुरे असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

Kagal-Peth Naka Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पेठ नाक्यावर कोंडी कायम; मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच, 51 टक्के कामानंतर जुना ठेका केला रद्द

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT