arvind kejriwal
arvind kejriwal 
Punjab Assembly Election 2022

"आप आता राष्ट्रीय शक्ती; अरविंद केजरीवाल होतील पंतप्रधान"

सकाळ डिजिटल टीम

चंडीगड: पंजाबमधील सुरुवातीच्या कलांमधूनच हे स्पष्ट झालंय की, या ठिकाणी आम आदमी पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. कृषी कायद्यांमुळे भाजपला मोठा फटका बसला असून अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. या साऱ्याचाच फायदा पंजाबमध्ये उपरेपणाने आलेल्या नवख्या आप पक्षाने घेत मुसंडी मारली आहे. भविष्यात आता आम आदमी पक्ष हाच भाजपसमोरचे मोठे आव्हान ठरणार असून अरविंद केजरीवाल हाच विरोधाचा चेहरा असणार असल्याचं वक्तव्य पंजाबमधील आपचे प्रमुख नेते राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे. (Punjab Assembly Election Result Live)

"आम्ही पहिल्या दिवसापासूनच म्हणत होतो की आम आदमी पक्ष पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. पंजाबवर अनेक दशके राज्य करणाऱ्या लोकांचे सिंहासन आज डळमळीत होत आहे. भविष्यात अरविंद केजरीवाल हे भाजपच्या समोरचे प्रमुख आव्हान असतील, तर 'आप' काँग्रेसची जागा घेईल. AAP आता राष्ट्रीय शक्ती आहे, अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील. आम्ही आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेऊ, असं राघव चढ्ढा यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आपण 'आम आदमी' आहोत. पण जेव्हा 'आम आदमी' उठतो तेव्हा सिंहासन सुद्धा हादरते. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. केवळ आम आदमी पक्ष आणखी एक राज्य जिंकत आहे म्हणून नाही तर हा पक्ष एक राष्ट्रीय शक्ती बनला आहे. आप पक्षच कॉंग्रेसची जागा बनेल.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून आज पाच राज्यांचं भवितव्य ठरणार आहे. हे भवितव्य जितकं राज्यांचं आहे तितकंचं ते त्या त्या राज्यातील मुख्य नेत्यांचंही ठरणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणीचे पहिले कल आले आहेत. या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरीकडे गोव्यामध्येही काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे. या निवडणुकींच्या कलांमधील महत्त्वाची बाब म्हणजे सध्या तीन विद्यमान मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT