भगवंत मान Sakal
Punjab Assembly Election 2022

ठरलं! 'या' तारखेला होणार भगवंत मान यांचा शपथविधी; राज्यपालांची घेतली भेट

भगवंत मान यांनी राज्यपालांची घेतली भेट, केला सत्ता स्थापनेचा दावा

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसला धोबीपछाड देऊन सत्ता काबिज करणाऱ्या आम आदमी पार्टीचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी शनिवारी चंदीगडमधील राजभवनात जाऊन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंजाबमध्ये आपण यापूर्वी कधीही झालं नाही असं काम करु असा विश्वास जनतेला दिला. (Bhagwant Mann declares date and time for sworn in cermoney meets with Governor)

मान म्हणाले, "आमच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन मी आज राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी केव्हा शपथविधीचा कार्यक्रम घ्यायचा याबाबत विचारणा केली. हा शपथविधी शहीद भगतसिंग यांच्या मूळगावी खाटकर कलान इथं होणार आहे. १६ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता हा शपथविधी सोहळा होईल"

पंजाबमधील घराघरांतून लोक या शपथविधी सोहळ्याला येतील. यावेळी लोक भगतसिंग यांना अभिवादनही करतील. आमच्याकडे चांगलं मंत्रिमंडळ असेल जे ऐतिहासिक निर्णय घेतील जे यापूर्वी कधीही घेतले गेलेले नाहीत. यासाठी तुम्हाला फक्त काही काळ वाट पाहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका! पंतप्रधान ओलींचा राजीनामा; तरुणाांनी अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारलं...

Islampur Crime: 'बेकायदेशीर जमाव जमवून इस्लामपुरात दोन गटांत हाणामारी'; पूर्वी झालेल्या वादाच कारण, पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल

Latest Marathi News Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

Ayush Komkar News: नातवाची हत्या, आजोबासह मावशी आणि भावंडं अटकेत | Vanraj Andekar | Bandu Andekar | Sakal News

Sangli Crime: 'शेगावमध्ये घरफोडीत ४ लाखांचे सोने पळविले'; जत पोलिसांत गुन्हा, शोधासाठी पथक रवाना

SCROLL FOR NEXT