Labh Singh Ugoke Team eSakal
Punjab Assembly Election 2022

मोबाईल रिपेअर करणाऱ्या 'आम आदमी'ने चारली CM चन्नींना धूळ

मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नींना दोन्ही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे.

सुधीर काकडे

Assembly Elections 2022 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत पंजाबमध्ये (Punjab) आपला आणि गोवा, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजप आघाडीवर आहे. या निवडणूक निकालानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळूम निघालं आहे. या एकूण सर्व निवडणूक निकालांमध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय, ती आम आदमी पक्षाच्या विजयाची. पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्ष तब्बल ९० जागांवर आघाडीवर आहे. यापूर्वी १२ जागा मिळवलेल्या आम आदमी पक्षाने (Aam Aadmi in Punjab) एवढी मोठी मुसंडी मारल्याने देशभरातील राजकीय वर्तुळात हा सध्या आम आदमी पक्षाचीच चर्चा सुरु आहे. आम आदमी पक्षाने अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या लोकांना तिकीट दिलं होतं. यामध्ये मुख्यत: चन्नींना (CM Charanjit Singh Channi) पराभुत करणाऱ्या आप उमेदवाराचं मोठं कौतुक होतंय.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी दोन जागांवर निवडणूक लढली. यातील एकाही ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला नाही. भदौर मतदार संघातून चन्नींच्या विरोधात भाजपने एका सामान्य पार्श्वभूमीतून येणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं होतं. त्या लाभ सिंग उगोके या उमेदवारानं चन्नींना पराभूत केलं. याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले, चरणजित सिंग चन्नी यांच्या पराभवावरून आपची ताकद दिसून येते. एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीनं थेट मुख्यमंत्र्याला हारवलं. त्यांच्याविरोधात कुणी मोठा नेता नव्हता.

दरम्यान, काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाबमध्ये ७७ आमदार असलेल्या काँग्रेसला (Congress) दारून पराभव स्विकारावा लागला आहे. एकूण पाच राज्यांत मिळून देखील काँग्रेसला शंभरी पार करता आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT