PM Narendra Modi Sakal
Punjab Assembly Election 2022

मोदींची गाडी पंजाबमध्ये बंद पडते तेव्हा... मतदानापूर्वी सांगितला किस्सा

मी पंजाबमध्ये खूप राहिलो आहे. पंजाबशी माझं मोठं नातं राहिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून, अनेक पक्षांकडून मतदारांना (Punjab Assembly Election 2022) आकर्षित करण्यासाठी ना-ना पद्धतींच्या घोषणा करण्यात येत आहे. एकूणच काय तर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहण्यात येत आहे. या सर्वांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब निवडणुकांपूर्वी एका जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. (Modi Recall Punjab Memories)

मोदी म्हणाले की, मी पंजाबमध्ये खूप राहिलो आहे. पंजाबशी माझं मोठं नातं राहिलं आहे. मी पक्षाचं काम तिथं करत होतो. पंजाबच्या लोकांचे शौर्य पाहिलं आहे. दहशतवादाची स्थिती गंभीर होती, सायंकाळी कोणी बाहेर पडायचं नाही. मी प्रवास करत होतो, काही कारणाने वेळ झाला. मी आणि माझा ड्रायव्हर निघालो. दुर्दैवाने गाडी रस्त्यात खराब झाली. तेव्हा जुनी अँबेसिडिर होती. तेव्हा शेतातील लोकं आले आणि त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मेकॅनिक मिळेल का? हे पाहिलं पण जवळ नव्हता.

तेव्हा लोकांनी म्हटलं की, वाईट वाटणार नसेल तर, तुम्ही आणि तुमचा ड्रायव्हर आमच्यासोबत थांबा, रात्री इथंच थांबून जा, सरदार कुटुंब होतं. ते म्हणाले की, इथंच थांबा आणि सकाळी जा आम्ही तिथे थांबलो दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाने जाऊन आमच्यासाठी मेकॅनिकला बोलवून आणल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT