Punjab Elections Results Updates Team eSakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Poll Result : पंजाबमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवाची पाच कारणं

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं मोठी मुसंडी मारली असून स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं (Punjab Election) मोठी मुसंडी मारली असून स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. तर सत्ताधारी काँग्रेसचा (Congress) दारुण पराभवाची चिन्ह आहेत. कारण आप सध्या ९० जागांवर तर काँग्रेस केवळ १२ जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पंजाब हा काँग्रेसचा गड मानला जात होता. पण एकूणच निकालातील चित्र पाहता काँग्रेसच्या पराभवाची समिक्षा करणं गरजेचं ठरलं आहे. हेच आपण या वृत्तांतामधून पाहणार आहोत. पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणं काय आहेत, हे पाहुयात. (Punjab Assembly Poll Result 2022 Five reasons for Congress drastic defeat)

१) अमरिंदर सिंग यांना जबरदस्तीनं राजीनामा द्यायला भाग पाडलं

शेतकरी आंदोलनात पंजाबच्या शेतकऱ्यानं वर्षभराचा मोठा लढा दिल्यानंतर खरंतर काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीचा मार्ग सुकर बनला होता. पण या शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा देणाऱ्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसनं जबरदस्तीनं राजीनामा द्यायला भाग पाडलं. याद्वारे काँग्रेसनं स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतला.

२) दलित मतदारांनी काँग्रेसकडं फिरवली पाठ

काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर काँग्रेसनं या जागी दलित शीख समाजातील चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. राज्यातील ३२ टक्के दलित वोट बँकेच्या दृष्टीनं खरंतर हा बदल करण्यात आला होता. पण ते देखील दलित मतदारांना आकर्षून घेऊ शकले नाहीत.

३) नवज्योत सिंग सिद्धूंच्या गोंधळाचा बसला फटका

दरम्यान, सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांची खुर्ची घालवल्यानंतरही चन्नी यांनाही त्रास द्यायला सुरुवात केली होती. यामुळं काँग्रेस एका दुभंगलेल्या स्थितीत, अस्ताव्यस्त घराप्रमाणं काँग्रेसची स्थिती बनली होती. यामुळं काँग्रेसपासून मतदारांचा मोठा वर्ग दुरावला.

४) अमरिंदर सिंग यांची भाजपशी हातमिळवणी पडली महागात

मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडीमुळं नाराज झालेल्या अमरिंदर सिंग यांनी वेगळा पंजाब लोक काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आणि निवडणुकीपूर्वीच भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळं अमरिंदर सिंग यांच्या पाठिशी असणारे मतदारही काँग्रेसपासून दुरावले.

५) आपकडून दिल्ली मॉडलचा काँग्रेसविरोधात यशस्वी प्रचार

पंजाबमध्ये काँग्रेसला यंदा आम आदमी पार्टीनं मोठी टक्कर दिली. पंजाबमध्ये केवळ काँग्रेस आणि आपमध्येच मुख्य लढत होईल, अशी स्थिती होती. यामध्ये आपनं बाजी मारली असून स्पष्ट बहुमतापर्यंत मजल मारली आहे. पंजाबच्या जनतेनंही आपच्या दिल्लीतील कामगिरीची दखल घेतली. काँग्रेसविरोधात भगवंत मान यांच्यासारखा पंजाबच्या मातीतला चेहरा आपनं मुख्यमंत्रीपदासाठी दिला. लोकसभा निवडणुकीत मान यांनी संगरुर मतदार संघातून तब्बल २ लाख मतांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. आपच्या या आगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीचा सामना काँग्रेस करु शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT