Salary hike 2024 esakal
Sakal Money

Salary Survey: २०२४ ठरणार अनलकी? पगारात होणार फक्त इतकी वाढ; वाचा कोणत्या क्षेत्रात किती टक्के?

Salaries in India to see slower growth in 2024, still maintain lead in APAC: Survey : २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.७ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे Aon’s सर्व्हेमध्ये यंदा कमी वेतनवाढ दाखवण्यात आलीये.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- येत्या काळात भारतातील नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.५ टक्के वाढ होऊ शकते, असं Aon’s वार्षिक वेतन वाढ आणि उलाढाल सर्व्हे २०२३-२४ मध्ये सांगण्यात आलं आहे. २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.७ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे Aon’s सर्व्हेमध्ये यंदा कमी वेतनवाढ दाखवण्यात आलीये. (Aon Salary India job market)

Aon’s चा सर्व्हे भारतीय नोकरदारांसाठी आशादायी आहे. कारण, या सर्व्हेमध्ये जगभरातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतामध्ये अधिक वेतनवाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. सर्व्हमध्ये ४५ उद्योग क्षेत्रातील १४१४ कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. कोरोना महामारीनंतर २०२२ मध्ये वेतनवाढीमध्ये वाढ नोंदवण्यात आली होती. पण, २०२४ मध्ये यात थोडी घट होताना दिसत आहे. (Salaries in India to rise 9.5% in 2024)

सर्व्हेनुसार, वित्तीय संस्था, अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये वेतनवाढ अधिक होईल, तर तंत्रज्ञान सल्ला, सेवा क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात वेतनवाढ होईल. उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वाधिक १०.१ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. विज्ञान आणि वित्तिय क्षेत्रात ९.९ टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता आहे.

२०२४ मधील अपेक्षित वेतनवाढ (Sector-wise projection here)

तंत्रज्ञान क्षेत्र आणि उत्पादने - 9.5%

जागतिक क्षमता केंद्रे - 9.8%

तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा - 8.2%

वित्तीय संस्था - 9.9%

फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स / फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर ड्युरेबल्स- 9.6%

उत्पादन -10.1%

जीवन विज्ञान -9.9%

रसायने -9.7%

रिटेल -8.4%

व्यावसायिक सेवा- 9.7%

ई-कॉमर्स -9.2%

वेतनामधील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची निदर्शक आहे. जागतिक परिस्थिती वेगळी असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात वाढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीला देखील फायदा होईल, असं Aon संस्थेचे भारतातील अधिकारी रुपं चौधरी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT