“December bank holiday schedule showing multiple closure dates and consecutive holidays across several Indian states.”
esakal
Bank Holiday Dates Next Week : पुढील आठवड्यात ८ ते १४ डिसेंबर दरम्यान बँकांना एकूण चार दिवस सुट्टी असणार आहे. मात्र हे सर्वच राज्यात नाही विविध राज्यांमधील स्थानिक सणांवर अवलंबून आहे. त्यामुळे बँकेच्या कामांचे नियोजन आधीच करावे लागणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या यादीनुसार, दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. शिवाय, प्रादेशिक आणि स्थानिक सणांवर अवलंबून बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. येत्या आठवड्यात शनिवार आणि रविवार शिवाय अन्य दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र या दोन सुट्ट्या सर्वच राज्यात नसतील.
९ डिसेंबर, मंगळवार रोजी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील. याचाच अर्थ या दिवशी केरळमध्ये बँका बंद राहतील. या दोन ठिकाणांव्यतिरिक्त, मंगळवारी देशातील उर्वरित भागात बँका खुल्या राहतील. तर शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी मेघालयात बँकांना सुट्टी असेल. पा तोगन नेंगमिंजा संगमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०२५ मध्ये १८ बँक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, त्यापैकी अनेक राज्यानुसार बदलतात. २५ डिसेंबर रोजी नाताळासाठी देशभरात बँका बंद राहतील, तर इतर सुट्ट्या फक्त काही शहरांना लागू होतील. तरी ग्राहकांनी शाखेत जाण्यापूर्वी सुट्टीबाबत माहिती घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.