Ashneer Grover on notice periods reveals truth behind notice periods watch viral video  
Business

Viral Video : 'कोई कुछ नहीं उखाड सकता…': अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं 'नोटीस पीरियड'मागचं सत्य

सकाळ डिजिटल टीम

ओशार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये रोखठोक मतं मांडण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अश्नीर ग्रोव्हर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ग्रोव्हर यांनी खाजगी कंपन्यांकडून नोकरदारांना देण्यात येणाऱ्या नोटीस पीरियडला अजीबात घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांनी या नोटीस पीरीयड मागचं सत्य देखील सांगितलं आहे.

ग्रोव्हर यांचा हा व्हिडीओ गाझीयाबाद येथील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नोलॉजी येथील आहे.या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थ्याने कर्मचाऱ्यांना कंपनीत काम करताना तीन महिन्यांचा नोटीस पीरियड पूर्ण करावा लागत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

विद्यार्थ्यांने ग्रोव्हर यांना विचारलं की. सध्या कोणत्याही कंपनीत नोकरी देताना कंपन्या तीन महिन्यांचा नोटीस पीरियड देतात आणि त्यांना लगेच रुजू व्हायला सांगितलं जाते. जर लोकांना नोकरी सोडायची असेलत तर तीन महिने वाट पाहावी लागते, तुम्ही सात वर्ष स्वतः नोकरी देखील केली आहे आणि बिझनेस चालवताना लोकांना नोकरीवरही ठेवलं आहे. तर यामागं कंपनीची नेमकी काय मानसिकता असते.

हेही वाचा - नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

यावर उत्तर देताना अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपन्यांची पोलखोल केली. ते म्हणाले की, हा योग्य प्रश्न आहे. एचआर लोक तुम्हाला अनेक कलमांवर सही करायला लावतात. नोटीस पीरीयड, नॉन कंपिंट, नॉन सॉलिसेट. तुम्हाला तीन महिने नोटीस पीरियड पूर्ण करावा लागेल किंवा कंपनी सोडल्यानंतर तुम्ही स्पर्धकासोबत काम करू शकत नाही . पण यापैकी एकही कायदा कोर्टात लागू पडत नाही.

मला एकही व्यक्ती दाखवा ज्याला कंपनी कोर्टात घेऊन गेली आणि कोर्टाने विरोधात निकाल दिला असेल, वास्तविकता समजून घ्या, काय होईल. कोर्टाचा विषय आला की लोक घाबरून जातात. लोकांना वाटतं की मीच सही केली होती. सही केली होती म्हणून काय झालं, उद्या तुमच्याकडून कोणी तुम्ही कंपनीचे गुलाम असं लिहून घेतलं तर तुम्ही गुलाम होता का? कोर्टात हे मान्य होणार आहे का?

जेव्हा कंपनी म्हणाली की तुम्हाला 3 महिन्यांचा नोटिस पीरियड पूर्ण करावा लागेल, आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी निघून जा तुमचं कोणीही काहीही वाईट करू शकणार नाही असेही ग्रोव्हर म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; सहकारमंत्र्यांची माहिती, प्राप्तिकर विभागाच्या माहितीअभावी विलंब

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थपूर्ण पर्स : गरज आणि चैनीतला फरक ओळखा

SCROLL FOR NEXT