Financial Planning Tips 30 year olds  Esakal
Business

Financial Planning Tips: तिशीच्या आधीच करा ही ५ कामं...आणि आर्थिक आयुष्य सुखात

Financial Planning Tips : सुरवातीच्या काळात आर्थिक नियोजन केल्यास रिटायरमेंटनंतरचा काळही सुखकर राहण्यास मदत होईल. काही तज्ञांच्यामते ३० वर्षांच्या आधी काही आर्थिक गोष्टींचं नियोजन केलंत तर आयुष्यात तणाव येणार नाही

सकाळ डिजिटल टीम

Financial Planning Tips : शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळावी ,त्यानंतर घर गाडी पुरेसा पैसा असं अनेकांचं स्वप्न असतं. तर काहीजण चांगला व्यवसाह करून आयुष्यात यश मिळवण्याचं स्वप्न पाहतात.

पण आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळवायचं असेल तर त्यासाठी फायनान्शिअल प्लॅनिंग Financial Planning म्हणजे आर्थिक नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. पैसा कमावण्यासोबतच तो योग्य ठिकाणी गुंतवणं आणि बचत Saving करणंही तितकचं गरजेचं आहे.

Financial planning tips for youth including emergency fund insurance term plan health insurance

साधरणत: 20 ते ३० या वयोगटात असताना नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात केली जाते. मात्र सुरुवातीच्या काळात तरुणांमध्ये येणाऱ्या उत्पन्नातून किंवा पगारातून बचत करण्याचं गांभिर्य नसतं. आर्थिक नियोजनाकडे ते गंभीरपणे पाहत नाहित.

वर्तमानातील सुख उपभोगण्यात अनेक तरुण भविष्याचा विचार करत नाहित. खरं तर आर्थिक नियोजनासाठी हिच योग्य वेळ असते. सुरवातीच्या काळात आर्थिक नियोजन केल्यास रिटायरमेंटनंतरचा काळही सुखकर राहण्यास मदत होईल.

काही तज्ञांच्यामते ३० वर्षांच्या आधी काही आर्थिक गोष्टींचं नियोजन केलंत तर आयुष्यात तणाव येणार नाही.  Financial Planning in 30s

इमर्जन्सी फंड बनवणं गरजेच (Emergency Fund)

साधारण ३० वर्ष पूर्ण होण्याआधीच तरुण नोकरीवर रूजू होतात. नोकरी किंवा बिझनेस सुरू केल्यानंतर तुमची प्राथमिकता ही एक इमरजंसी फंड सुरू करणं असावी. या फंडमध्ये किमान तुमचा सहा महिन्यांचा संपूर्ण खर्च भागेल एवढी रक्कम कायम असावी.

जसं की तुमचा रोजचा खर्च, घरं भाडं, EMI. अचानक नोकरी गेल्यास किंवा व्यवसाय धोक्यात आल्यास तसचं मेडिकल एमरजंसीवेळी हा फंड उपयोगी पडेल. इतर कोणत्याही साधारण कामासाठी या फंडातील पैसे वापरू नये.

इमरजंसी फंड हा चांगला इंटरेस्ट मिळणाऱ्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये काढावं. इमरजंसी फंडमुळे तुम्हाला गरजेच्या वेळी कर्जही घेण्याची गरज भासणार नाही.

रिटायरमेंट प्लॅनिंग गरजेचं (Retirement Planning)

नोकरी लागल्यानंतर लगेचच म्हणजेच वयाच्या तीसीपूर्वीच रिटायरमेंट प्लॅन Retirement Plan करणं गरजेच आहे. अजून खूर वेळ आहे असं म्हणत तरुणाई रिटायमेंट नंतरच्या काळाकडे दूर्लक्ष करते. मात्र निवृत्तीनंतर कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या पैशावर सुखी जीवन जगायचं असेल तर वेळीच रिटायरमेंट प्लॅन retirement planning करणं गरजेचं आहे.

३० वर्ष उलटल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या वाढतात. जसं की मुलांचं शिक्षण, घराचे हप्ते, गाडी असे अनेक मोठे खर्च असतात त्यामुळे निवृत्तीनंतरसाठी पैसा बाजुला काढणं कठिण होतं. यापेक्षा नोकरी लागल्यानंतर लगेच रिटायरमेंटनंतरसाठी पैसै सेव्ह करणं योग्य. ३० वर्षांनंतरच्या परिस्थितीचा, महागाईचा साधारण अंदाज घेऊन एखाद्या रिटायरमेंट प्लानमध्ये तुम्ही इनव्हेस्ट करू शकता. 

हे देखिल वाचा-

इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करू नका

आजही अनेकजण इश्युरन्स म्हणजेच विम्याकडे गांभिर्याने पाहत नाहीत. तुमचं आर्थिक नियोजन करताना त्यात इन्शुरस अत्यंत महत्वाचा आहे. यात टर्म लाइफ प्लान आणि हेल्द इंन्शुरन्स हे दोन्ही समाविष्ट असणं गरजेचं आहे.

वयाच्या ३०नंतर कुटुंबाची जबाबदारी वाढलेली असते. यासाठीच एक चांगला टर्म लाइफ प्लान असणं गरजेच आहे. एखाद्या व्यक्तीच्या अकाली निधनानंतर त्या व्यक्तीचा टर्म प्लान हा त्याच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरतो. तर अलिकडे औषधोपचार चांगलेच महागले आहेत.

यासाठीच हेल्द इन्शुरन्स असणं सध्याच्या काळात अतिमहत्वाचं आहे. वर्षाला काही हजार रुपये हेल्थ इन्शुरन्समध्ये टाकून तुम्ही मेडिकल इमर्जन्सीसाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च वाचवू शकता. life term plan

इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलियो (Investment Portfoli)

अनेक तरुण नोकरीच्या सुरुवातीला गुंतवणूक करताना केवळ एकाच प्रकारची किंवा एका ठिकाणी गुंतवणूक करतात. तर गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणं गरजेचं आहे.

एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगल्या कालावधीसाठी कमी अधिक प्रमाणात ती करावी.

कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना किती जास्त रिटर्न मिळतील यासोबतच तिथे गुंतवणूक करणं सेफ म्हणजेच सुरक्षित आहे हे पडताळणं गरजेचं आहे. यासाठी म्युचअल फंड, पीपीएफ, आरडी. एफडी, एनएससी, SIP अशी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा.

त्याचप्रमाणे नोकरीच्या सुरुवातीच्या काळात मालमत्ता किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. (Investment Plans For Best Returns)

खर्चांची नोंद ठेवा 

नोकरी लागल्यानंतर किंवा वय २० ते ३० असताना बिझनेस सुरू केल्यानंतर अनेक तरुण तरुणाईच्या धुंदीत मोठी खर्च करतात. यावेळी कुठे आणि किती पैसे खर्च होत आहेत याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

मात्र अधिक बचत करण्यासाठी हाच योग्य काळ असतो. यासाठी खर्चांची नोंद ठेवणं गरजेच. यात EMI, घर भाडं, रोजचा घरखर्च याची यादी बनवावी. यात गुंतवणूकीची देखील नोंद ठेवावी. खर्च करण्यापूर्वी आधी बचत करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवावं. 

तुमचं वय ३० होण्यापूर्वीच जर तुम्ही खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचा योग्य मेळ घातला तर संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला पैशांची चिंता करण्याची गरज भासणार नाही आणि आयुष्य सुखकर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT