रिटेल बिझनेस लोन Esakal
Business

Retail Business Loan म्हणजे काय? कोणाला आणि कशासाठी मिळू शकतं हे कर्ज

नव्या ट्रेंडनुसार किंवा डिमांड, सिझननुसार व्यापाऱ्यांना इन्वेंट्री सज्ज ठेवावी लागते. ग्राहकांच्या खरेदीनंतर व्यापारांना नफा होत असला तरी सुरुवातीला गुंतवणूक करण्यासाठी व्यापारांना रिटेल लोनचा पर्याय उपलब्ध असतो

Kirti Wadkar

कोणत्याही व्यापाऱ्याला आपला व्यापार वाढवण्यासाठी किंवा व्यापारातील Trade खर्चासाठी कायम पैशांची गरज भासत असते. यासाठी व्यापारी बँकांकडून रिटेल बिझनेस लोन Loan घेऊ शकतात. Know About Retail business loan to expand your trade

बँकांनी खास करून व्यापाऱ्यांच्या किरकोळ गरजा पूर्ण करण्यासाठी तसंच त्यांना व्यापारात लागणाऱ्या प्रोडक्टच्या खरेदीसाठी या खास लोनची सुविधा दिली आहे. रिटेल बिझनेस लोन Business Loan हे वेगवेगळ्या उद्देशांनी दिलं जातं.

व्यापाऱ्यांसाठी तसचं एखादा लघू किंवा छोटा रिटेल व्यवसाय Retail Business सुरू करण्यासाठी म्हणजेच एखादं दुकान, एजन्सी किंवा सुपरमार्ट अशा व्यवसायांसाठी बँकांकडून रिटेल लोन देण्यात येतं.

इन्वेंटरी- खास करून इन्वेंट्री खरेदीसाठी रिटेल बिझनेस लोन घेतलं जातं. दुकानदारांना किंवा कोणत्याही व्यवसायिकांना Businessmen आपल्या ग्राहकांसाठी विकलं जाणारं प्रोटक्ट कायम तयार ठेवावं लागतं. या प्रोडक्टच्या खरेदीसाठी किंवा निर्मितीसाठी अनेकदा सुरुवातीला पैशांची आवश्यकता भासते.

नव्या ट्रेंडनुसार किंवा डिमांड, सिझननुसार व्यापाऱ्यांना इन्वेंट्री सज्ज ठेवावी लागते. ग्राहकांच्या खरेदीनंतर व्यापारांना नफा होत असला तरी सुरुवातीला गुंतवणूक करण्यासाठी व्यापारांना रिटेल लोनचा पर्याय उपलब्ध असतो.

दुकानाचा विस्तार किंवा दुरुस्ती- अनेकदा व्यापार वाढत गेल्यास दुकानदारांना दुकानाचा विस्तार वाढवावा लागतो. तसंच काही वर्षांच्या अंतराने दुकानाची दुरुस्ती, नवं फर्निचर किंवा रंगकाम अशा कामांसाठी देखील व्यापारी रिटेल लोन घेऊ शकतात.

हे देखिल वाचा-

नवं आउटलेट- अनेकदा व्यापारामध्ये चांगला नफा होवू लागल्यानंतर व्यावसायिक किंवा दुकानदार एखादं आणखी दुकान किंवा आउटलेट सुरु करण्याचा विचार करतात.

तसंच वेगळ्या प्रोडक्ट रेंज म्हणजेच उत्पादनांसाठी आणखी एखादं दुकान किंवा आऊटलेट भाड्याने घेणं किंवा खरेदी करणं तसचं ते संपूर्ण तयार करणं यासाठी व्यावसायिक रिलेट बिझनेस लोन घेऊ शकतात.

मार्केटिंग- कोणत्याही व्यवसायामध्ये नफा कमावण्यासाठी मार्केटिंग हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. मार्केटिंगवर खर्च केल्यास अधिक ग्राहकांपर्यंत पोहचणं शक्य होतं. उत्पादन किंवा ऑफर्स, नव्या स्किम्स ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी मार्केटिंगवर खर्च करणं गरजेचं ठरतं. अशा वेळी मार्केटिंगसाठी लागणाऱ्या खर्चासाठी दुकानदार बँकाकडून रिटेल लोन घेऊ शकतात.

एकंदरच रिलेट बिझनेस लोन हे केवळ रिटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा एखाद्या दुकानाच्या खरेदी किंवा दुरुस्ती तसंच सुशोभिकरणासाठी लागणाऱ्या खर्चासोबतच अनेक इतर उद्देश साध्य करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तुमची ग्राहक सेवा अधिक चांगली करण्यासाठी, व्यवसायाचा विस्तार वाढवून विक्री वाढवण्यासाठी अशा अनेक उद्देशांसाठी रिटेल बिझनेसचा पर्याय व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असतो.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसाची संततधार सुरु, सखल भागांत पाणी साचले

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT