Jeff Bezos Esakal
Business

Amazon : जेफ बेझोस यांनी गर्लफ्रेंडसोबत केली एंगेजमेंट? नव्या फोटोंमुळे चर्चा

जेफ आणि लॉरेन हे गेल्या पाच वर्षांपासून एकत्र आहेत.

Sudesh

अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे आपल्या गर्लफ्रेंडसोबत एंगेज असल्याचे वृत्त सध्या माध्यमांमध्ये येत आहे. लॉरेन सँचेज असं त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. हे दोघे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये एकत्र दिसून आले.

लग्नासाठी आहेत तयार?

जेफ आणि लॉरेन हे गेल्या पाच वर्षांपासून एकत्र आहेत. या दोघांनी एंगेजमेंट केली असून, आता ते लग्नासाठी देखील तयार असल्याच्या अफवा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. २०१८ साली त्यांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. २०१९ मध्ये त्यांच्या अफेअरच्या अफवा सुरू झाल्या होत्या. मात्र, जेफ यांनी हे नातं लपवून ठेवलं होतं. पुढे आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर जेफ यांनी गर्लफ्रेंड सोबतचं नातं जाहीर केलं.

लॉरेन सँचेज ही एक ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट होती. तिचं यापूर्वी पॅट्रिक व्हाईटसेल यांच्यासोबत लग्न झालं होतं. पॅट्रिक आणि लॉरेनला दोन मुलंही आहेत.

अंगठीमुळे चर्चा

गेल्या काही दिवसांपासून जेफ यांची गर्लफ्रेंड लॉरेनच्या हातात एक अंगठी दिसून येत आहे. हार्ट शेपच्या या अंगठीमुळेच या दोघांनी एंगेजमेंट केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 'पेज सिक्स' या वेबसाईटने आपल्या सूत्रांचा हवाला देत याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Jeff Bezos with Girlfriend

सर्वात महागडा घटस्फोट

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा घटस्फोट जगातील सर्वात महागडा घटस्फोट समजला जातो. त्यांची माजी पत्नी मॅकेंझी स्कॉट यांना पोटगी म्हणून ३८ अब्ज डॉलर्स मिळाले होते. यानंतर त्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला झाल्या होत्या. यासोबतच मॅकेंझी यांच्याकडे अमेझॉनचे २५ टक्के शेअर्सही आहेत. घटस्फोटाच्या पोटगीपैकी अर्धी रक्कम दान करण्याचा निर्णय मॅकेंझी यांनी घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT