Zomato launches pure veg mode and fleet for vegetarian 
Business

Zomato News : 'शुद्ध शाकाहारी' ग्राहकांची चिंता मिटणार! झोमॅटोने सुरू केली खास सर्व्हिस; जाणून घ्या सविस्तर

Zomato launches pure veg mode and fleet for vegetarian : देशात शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे. अशा शाकाहारी ग्राहकांसाठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने मोठा निर्णय घेतला आहे.

रोहित कणसे

Zomato launches pure veg mode and fleet for vegetarian : देशात शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे. अशा शाकाहारी ग्राहकांसाठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने मोठा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने आपला 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' या दोन नवीन सेवा भारतातील शाकाहारी नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लॉन्च केल्या आहेत.

झोमॅटोचे फाउंडर आणि सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दलची घोषणा केली आहे.

दीपंदर गोयल म्हणाले की, ग्राहकांचे त्यांच्या आहारातील प्राधान्याक्रम लक्षात घेऊन, आम्ही आज झोमॅटोवर 'प्युअर व्हेज फ्लीट' सोबत 'प्युअर व्हेज मोड'' लाँच करत आहोत, ज्या ग्राहकांना 100 टक्के शाकाहारी आहार हे प्राधान्य आहे त्यांच्यासाठी ही सर्व्हिस असेल असेही त्यांनी म्हटले आहे

गोयल म्हणाले की देशातील शाकाहारी लोकांकडून मिळालेला फीडबॅक लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जगाच्या तुलनेत भारतात शाकाहारी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे, आणि त्यांचे अन्न कसे शिजवले जाते किंवा कसे हाताळले जाते याबद्दल ते अतिशय आग्रही आहेत. आम्हाला त्यांच्याकडून मिळालेला एक महत्त्वाचा अभिप्राय आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.

ही सर्व्हिस कशी असणार आहे?

झोमॅटोने सुरू केलेल्या प्युअर व्हेज मोडमधील रेस्टॉरंट्समध्ये फक्त शाकाहारी जेवण बनवणाऱ्या आणि सर्व्ह करणाऱ्या आउटलेटची यादी असेल.

प्युअर व्हेज मोडमध्ये फक्त शुद्ध शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सचा समावेश असेल आणि कोणत्याही मांसाहारी पदार्थाची सेवा देणारी सर्व रेस्टॉरंट वगळली जातील असेही गोयल यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. गोयल यांनी मात्र नव्याने सुरू केलेली सेवा कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय आवडीनिवडींमध्ये भेदभाव करत नाही, असेही नमूद केले.

भविष्यात, आम्ही विशेष ग्राहकांच्या गरजांसाठी अधिक स्पेशलाइस्ड फ्लीट्स जोडण्याची योजना आखत आहोत. उदाहरणार्थ, हायड्रॉलिक बॅलन्सरसह एक विशेष केक डिलिव्हरी फ्लीट आणली जात आहे जे डिलिव्हरी दरम्यान तुमचा केक खराब होणार नाही याची काळजी घेईल असेही गोयल यांनी यावेळी सांगितले. यासोबतच त्यांनी स्पेशल केक डिलीव्हरी फ्लीट पुढील काही आठवड्यांमध्ये लाइव्ह होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT