U.S. President Donald Trump during the official announcement of new tariffs imposed on six countries, including Philippines, Brunei, and Iraq.  esakal
Sakal Money

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

New US Trade Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संबंधित सहा देशांच्या प्रमुखांना अधिकृत पत्रे पाठवून कराबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

Mayur Ratnaparkhe

Donald Trump Announces New Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगभरातील देशांवर टेरिफ लादण्याचा धडका सुरूच आहे. आता आणखी सहा देशांवर ट्रम्प यांनी टेरिफ बॉम्ब फोडला आहे. यामध्ये इराक, फिलीपिन्स, लिबिया, मोल्दोव्हा, अल्जेरिया आणि ब्रुनेई या देशांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया आणि जपानसह इतर १४ देशांवर कर जाहीर केले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. आता हे ६ नवीन देश देखील कर यादीत समाविष्ट झाले आहेत. अमेरिकेचा हा नवीन कर आदेश १ ऑगस्ट २०२५ पासून अंमलात येणार आहे.

ट्रम्प यांनी फिलिपिन्स, मोल्दोव्हा आणि ब्रुनेईवर प्रत्येकी २५ टक्के तर इराक, अल्जेरिया अन् लिबियावर प्रत्येकी ३० टक्के कर टेरिफची घोषणा केली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या देशांच्या नेत्यांना अधिकृत पत्रे पाठवली आहेत आणि कराबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

 ट्रम्प प्रशासनाचा असा विश्वास आहे की अमेरिकन व्यापार हितांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. या निर्णयाअंतर्गत सर्वोच्च कर ३० टक्के निश्चित करण्यात आला आहे,  जो इराक, अल्जेरिया आणि लिबियाला लागू होईल.

याआधी ट्रम्प यांनी ब्रिक्स देश ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के कर लादण्याचे जाहीर केले होते. याशिवाय ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, औषध उत्पादनांवरील कर एका वर्षात २००टक्के वाढू शकतो. या सर्वांमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT