epfo Latest News 
Sakal Money

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

EPFO Latest News : कर्मचारी आपल्या पीएफ अकाउंटमधून हवे तेव्हा पैसे काढू शकतात, मात्र बऱ्याचदा अडव्हांस काढताना बराच वेळ लागतो.

रोहित कणसे

कर्मचारी आपल्या पीएफ अकाउंटमधून हवे तेव्हा पैसे काढू शकतात, मात्र बऱ्याचदा अडव्हांस काढताना बराच वेळ लागतो. मात्र आता असे होणार नाहीये, कारण EPFO ने क्लेम सॉल्यूशन सुरू केले असून आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आयटी सिस्टमच्या मदतीने आता ऑटोमॅटीक पद्धतीने क्लेम सेटल करण्यात येतील.

तुम्ही कुठल्यातरी अडचणीत सापडलात आणि तुम्हाला ताबडतोब पैशांची गरज असेल तर तुम्ही पीएफ म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड (PF Auto Mode Settlement) मधील बचत केलेला पैसा काढू शकता. ही रक्कम तुमच्या कमाईमधून कापलेली असते.

फक्त तीन दिवसात मिळणार एक लाख

ऑटो मोडच्या माध्यमातून सेटलमेंटची प्रोसेस २०२० साली कोरोना काळातच सुरू करण्यात आली होती. मात्र तेव्हा फक्त आजारपणानिमीत्त पैसे काढता येत होते. पण आता शिक्षण, लग्न आणि घर खरेदी करण्यासाठी देखील पैसे काढता येणार आहेत. लग्नाच्या बाबतीत तर बहिणीचे किंवा भावाचे लग्न असल्यास देखील अडव्हांस फंड काढता येणार आहे. ईपीएफओने ऑटो मोडच्या माध्यमातून क्लेम सेटलमेंटची रक्कम ५०,००० रुपयांहून वाढवून ती १ लाख रुपये केली आहे. मात्र हा फंड काढण्यासाठी काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत.

अटी अन् नियम काय आहेत?

जर तुम्ही आजारी असाल्यामुळे ईपीएफओ चा अडव्हांस क्लेम करु इच्छित असाल तर यामध्ये कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाहीये.

नियमानुसार जर तुम्ही आजारी पडल्याने सहा महिने बेसिक सॅलरी आणि डीए किंवा कर्मचाऱ्यांच्या योगदानावर मिळणारे व्याज यापैकी जे कमी असेल ते काढू शकता.

मेडिकल खर्चासाठी अडव्हांस क्लेम करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर किंवा कंपनीकडून जारी करण्यात आलेलं सर्टिफिकेट जमा करावे लागेल.

घर खरेदी किंवा लग्नासाठीच्या खर्चासाठी अडव्हांस क्लेम करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी ईपीएफओ मेंबर होऊन सात वर्षांहून अधिक काळ झालेला असणे आवश्यक आहे.

दोन्हीचा अडव्हांस क्लेम केल्यास तुम्ही जमा झालेली रकमेवर मिळणाऱ्या व्याजाच्या ५० टक्के अमाउंट क्लेम करता येईल.

लग्नाच्या खर्चासाठी काढलेल्या पैशांना तुम्ही सेल्फ डिक्लेरेशनसाठी क्लेम करु शकता.

घर खरेदीसाठी आणि रिनोवेशनसाठी ईपीएफमधून अडव्हांस क्लेम करता येतो.

घर खरेदीसाठी अडव्हांस क्लेम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष ईपीएफ मेंबर असणे आवश्यक आहे.

घर खरेदीसाठी, तुम्ही २४ महिन्यांची बेसीक सॅलरी मूळ पगार आणि DA आणि रिनोवेशनसाठी, तुम्ही ३६ महिन्यांचा मूळ पगार आणि DA क्लेम करू शकता.

अडव्हांस क्लेमची प्रक्रिया काय आहे?

EPFO ​​पैसे काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन माध्यमातून फॉर्म ३१ सबमिट करावा लागेल.

यासाठी तुम्हाला EPFO ​​पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यासाठी UAN आणि पासवर्ड आवश्यक आहे.

ऑनलाइन सेवांमध्ये क्लेम सेक्शन निवडा, मग तुम्हाला ज्या कारणामुळे पैसे काढायचे आहेत ते कारण सांगावे लागेल.

बँक खात्याची पडताळणी केल्यानंतर, चेक किंवा बँक खात्याच्या पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT