Foxconn Chennai Esakal
Sakal Money

Foxconn: 'विवाहित महिलांना iPhone निर्मिती कंपनीत नोकरी नाही? सरकारने उचलले मोठे पाऊल

Chennai: Apple चे चेन्नईमध्ये असेंब्ली युनिट फॉक्सकॉनद्वारे चालवले जाते. येथे विवाहित महिलांना नोकरी दिली जात नसल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

आशुतोष मसगौंडे

Apple चे चेन्नईमध्ये असेंब्ली युनिट फॉक्सकॉनद्वारे चालवले जाते. येथे विवाहित महिलांना नोकरी दिली जात नसल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

एका अहवालानुसार, फॉक्सकॉन आपल्या प्लांटमध्ये विवाहित महिलांना कामावर ठेवू इच्छित नाही कारण या महिलांकडे कुटुंब आणि मुलांची जबाबदारी असते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडथळा येतो.

2022 मध्ये ॲपल आणि फॉक्सकॉनने हे सर्व आरोप स्वीकारले होते. त्यावेळी त्यांनी यामध्ये बदल करण्याचा दावाही केला होता. पण हा प्रकार अजूनही सुरूच अससल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पार्वती आणि जानकी या दोन बहिणींना याचा फटका बसला आहे. त्यांनी WhatsApp वर नोकरीची जाहिरात पाहिली आणि त्यानंतर मार्च 2023 मध्ये फॉक्सकॉन प्लांटमध्ये गेली.

येथे पोहोचल्यावर तिला विचारण्यात आले की, तिचे लग्न झाले आहे. त्यानंतर त्यांना नोकरी नाकारल्याचे पार्वतीने सांगितले. "आम्हा दोघींचे लग्न झाल्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली नाही, असेही पार्वतीने स्पष्ट केले." या दोन बहिणी प्लँटवर जात असताना रिक्षाचालकाने त्यांना सांगितले होते की, तेथे विवाहित महिलांना कामावर ठेवले जात नाही.

या प्रकरणाबाबत फॉक्सकॉनचे माजी एचआर एस. पॉल यांनी म्हटले आहे की, कंपनीने हायरिंग एजन्सींना विवाहित महिलांना कामावर न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना लिखित स्वरूपात नसून तोंडी स्वरूपात देण्यात आल्या आहेत.

पॉल यांनी सांगितले की, कंपनीला वाटते की विवाहित महिलांवर कुटुंब आणि मुलांच्या खूप जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे त्यांना सतत सुट्टी घ्यावी लागते आणि त्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तमिळनाडू सरकारच्या कामगार विभागाकडून तपशीलवार अहवाल मागवला आहे.

प्रादेशिक मुख्य कामगार आयुक्त कार्यालयालाही या प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT