Holi 2024 Bank Holidays : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार मार्च २०२४ मध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तब्बल १४ दिवस बँकांना सुट्ट्या असतात. यादरम्यान आता होळीचा सण सोमवारी आल्याने पुन्हा सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत.
रविवार यासोबतच दुसरा आणि चौथा शनिवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि काही प्रादेशिक सुट्ट्यासंह या सगळ्या सुट्ट्या राज सरकारे आणि आरबीआय हे दोघे मिळून ठरवत असतात.
मार्च महिन्यात असलेल्या सुट्ट्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये १४ दिवस बँका बंद आहेत। यामध्ये वेगवेगळ्या सणांचा देकील समावेश आहे.
दरम्यान होळी यंदा सोमवारी येत असल्याने अनेक राज्यांमध्ये शनिवार व रविवारची सुट्टी जोडून बँक कर्मचाऱ्यांना लाँग विकेडचा आनंद घेता येणार आहे. कारण होळीच्या आधी रविवार आणि त्याआधी महिन्याचा चौथा शनिवार येत आहे.
या लाँग विकेंडसाठी बँका बंद असणाऱ्या राज्यांमधअये त्रिपुरा, गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, जम्मू,सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, चंदीगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, मेघालय, उत्तर प्रदेश, छत्तीसगड झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
यासोबतच २९ मार्च रोजी त्रिपुरा, आसाम, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि श्रीनगर वगळता बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. मुंबईत ८, २५ आणि २९ मार्च रोजी बँकांना सुट्टी असणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.