IMF Forecast esakal
Sakal Money

IMF Forecast: भारतासह इतर तीन देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान देतील- रिपोर्ट

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ( International Monetary Fund) सहा मार्च रोजी आपला नवा अंदाज प्रसिद्ध केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ( International Monetary Fund) सहा मार्च रोजी आपला नवा अंदाज प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सांगण्यात आलंय की, भारत, चीन, अमेरिका आणि इंडोनेशिया हे चार देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये पुढील पाच वर्षात महत्त्वाचं योगदान देत राहतील. (IMF Forecast for India)

सोमवारी जाहीर झालेल्या या रिपोर्टमध्ये भारत महत्वाच्या भूमिकेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान या चार देशांचे असेल. विशेष म्हणजे आयएमएफने २०२३ मध्ये देखील अशाच प्रकारचा अंदाज व्यक्त केला होता. (Three Other Countries To Contribute More Than Half of Global Economic Growth in Next Five Years)

भारत ही जगातील सर्वाधिक गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताचा आर्थिक विकास दर हा सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान राहिलेला आहे. जगातील अनेक देशांवर आर्थिक संकट आलेले आहे. शिवाय, अनेक देशांचा आर्थिक विकास संथ गतीने होत आहे. अशा स्थितीत भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. आयएमएफच्या रिपोर्ट एकप्रकारे यावर शिक्कामोर्तब केले आहे.

पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

भारत हा विकसनशील देशांमध्ये मोडतो. अशा स्थितीत भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी आणखी काही वर्ष जावी लागणार आहेत. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक गतीने वाढत आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. केंद्र सरकारने भारताला तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पाहिले आहे. (Latest Marathi News)

मूडीजची रेटिंग

जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. मूडीजने यापूर्वी ६.१ अर्थव्यवस्था वाढीचा वेग दर्शवला होता. तो वाढवून आता ६.८ टक्के करण्यात आला आहे.

मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे. या कालावधीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के राहिला. जागतिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्था वाढीचा वेग ६.६ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यापेक्षा सध्या जाहीर झालेला अंदाज खूप पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उत्तरेत थंडीची लाट तर दक्षिणेत पावसाचा कहर; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Satara News: सातारा जिल्ह्यातील ‘जयवंत शुगर’, ‘ग्रीन पॉवर’ला ३८ लाखांचा दंड; साखर आयुक्तांचे आदेश, नेमकं काय कारण?

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

SCROLL FOR NEXT