Deputy Governor Of RBI Michael Debbrat Patra  Esakal
Sakal Money

Indian Economy: 'या' वर्षापर्यंत भारत होणार जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आरबीआय अधिकाऱ्याने सांगितला प्लॅन

Deputy Governor Of RBI: सध्या परचेसिंग पॉवर पॅरिटी (PPP) अटींमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आधीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

आशुतोष मसगौंडे

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांनी म्हटले आहे की, भारत पुढील दशकात 10 टक्के विकास दर गाठू शकतो.

देश गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या बदलांच्या माध्यमातून आव्हानांवर मात करत आहे. अशा स्थितीत भारत 2032 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि 2050 पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकते.

नुकतेच जपानमधील क्योटो येथे नोमुराच्या 40व्या 'सेंट्रल बँकर्स सेमिनार'मध्ये 'भारतीय अर्थव्यवस्था: संधी आणि आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, 'भारताच्या अलीकडच्या अर्थिक वृद्धीच्या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.

IMF ची अपेक्षा आहे की, भारताने जागतिक वाढीमध्ये 16 टक्के योगदान द्यावे, जो बाजार विनिमय दरांच्या बाबतीत जगातील दुसरा सर्वात मोठा वाटा आहे. यानुसार, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या दशकात जर्मनी आणि जपानला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी (PPP) अटींमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आधीच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

दुसरीकडे, भारताला 2047 पर्यंत $35 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी पुढील तीन दशकांत 9-10 टक्के विकास दर गाठण्याची गरज आहे, असे भारताचे G-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी नुकतेच सांगितले.

जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत 2027 पर्यंत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताने उच्च दराने विकास केला पाहिजे. भारताचा विकास दर तीन दशकांपर्यंत 9-10 टक्के दराने व्हायला हवा, अशी अपेक्षा कांत यांनी व्यक्त केली.

भारताची अर्थव्यवस्था ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच 8.4 टक्के दराने वाढली, जी गेल्या दीड वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज ७.६ टक्क्यांवर नेण्यात मदत झाली आहे.

दास म्हणाले, "2047 पर्यंत आपण केवळ 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू नये, तर दरडोई उत्पन्न सध्याच्या $3,000 वरून $18,000 पर्यंत वाढवू शकू अशी अपेक्षा असायला हवी," सध्या भारतीय अर्थव्यवस्था 3,600 अब्ज डॉलरची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT