PPF Returns Calculator
PPF Returns Calculator Esakal
Investment

PPF Calculator: दर महिन्याला गुंतवणूक केल्यानंतर किती मिळतील पीपीएफचे रिटर्न्स?

Kirti Wadkar

PPF Returns Calculator: PPF ही केंद्र सरकारची एक बचत योजना असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखिम किंवा तोटा होण्याचा धोका नाही. शिवाय PPF मधील गुंतवणूकीतून Investment तुम्हाला चांगला परतावा देखील मिळू शकतो. Investment Tips Marathi Know How much you can earn after PPF Maturity

PPF चा मॅच्युरिटी पिरियड हा १५ वर्षांचा असतो. म्हणजेच एकदा गुंतवणूक केल्यानंतर १५ वर्षांनी तुम्ही ती रक्कम काढू शकता. या योजनेत ७.१० टक्के व्याज गुंतवलेल्या Investment रक्कमेवर प्रतिवर्षी मिळतो.

या योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी ५०० रुपये तर जास्तीत जास्त १.५ लाक रुपये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्ही टॅक्समध्येही Tax बचत करू शकता.

PPF च्या मॅच्युरिटीचा काळ १५ वर्षांचा असला तरी तुम्ही तुम्हाला हवे असल्यास पुढे देखिल हे खाते सुरू ठेवू शकता. तसचं १५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतरही खातेधारक ५ वर्षांच्या काळासाठी कितीही वेळा मॅच्युरिटीचा काळ वाढवू शकतात. यामुळे चांगला फायदा मिळतो.

दर महिन्याला ठराविक रक्कम म्हणजेच १ हजार किंवा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला या योजनेतून किती लाभ मिळू शकतो हे जाणून घेऊयात.

हे देखिल वाचा-

PPFमध्ये महिन्याला २ हजार रुपये गुंतवणूक

PPF कॅल्क्युलेटर PPF Calculator नुसार जर तुम्ही दर महिन्याला PPF खात्यामध्ये २ हजार रुपये जमा करत असाल तर वर्षभरात तुमची २४, ००० रुपयांची गुंतवणूक होईल. अशा प्रकारे १५ वर्षात तुमची ३ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक होईल.

या रक्कमेवर ७.१ टक्क्यानुसार चक्रवाढ व्याजाची रक्कम २ लाख ९० हजार रुपये मिळतील. म्हणजेच दर महिन्याला २ हजार रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला १५ वर्षांनी ६ लाख ५० हजार ९१३ रुपये परतावा मिळेल.

३ हजार रुपयांची गुंतवणूक

पीपीएफ अकाउंटमध्ये महिन्याला तुम्ही ३००० रुपयांची गुंतवणूक करत असाल तर वर्षभरामध्ये ३६ हजार रुपयांची गुंतवणूक होईल. १५ वर्षांच्या काळात तुम्ही ५ लाख ४० हजार या खात्यात गुंतवले असतील, तर चक्रवाढ व्याज ४, ३६, ३७० रुपये या रक्कमेसोबत जोडल्यास तुम्हाला १५ वर्षांनी ९, ७६, ३७० रुपयांचा परतावा मिळेल.

एकंदरच जितके मोठी रक्कम तुम्ही दर महिन्याला या खात्यामध्ये जमा करण्यासाठी ठरवाल तितकं जास्त चक्रवाढ व्याजाची रक्कम आणि परतावा तुम्हाला मिळेल.

पीपीएफ खात्याचा आणखी एक फायदा म्हणजे मॅच्युरिटीनंतरही तुम्ही खातं सुरू ठेवू शकता. यासाठी तुम्हाला पुढे गुंतवणूक करायची नसेल तरी मॅच्युरिटी आपोआप ५ वर्षांसाठी वाढली जाईल. त्यामुळे तुम्हाला एकूण रक्कमेवरील व्याज मिळत राहिल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT