Sakal Money

आजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले अन् सांगायला विसरले, आज नातू झालाय लखपती

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- चंदिगढच्या एका डॉक्टरांना घरातील जुन्या वस्तू शोधताना एक सुखद धक्का बसला. डॉक्टर तन्मय मोतीवाला हे बालरोग सर्जन आहेत. घरातील जुन्या वस्तूंमध्ये त्यांना अनपेक्षितपणे काही कागदपत्रं आढळली आहेत. तन्मय यांच्या आजोबांनी १९९४ मध्ये म्हणजे जवळपास ३० वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी केले होते. हे शेअर्स त्यांच्यासाठी मोठ्या लाभाचे ठरले आहेत. (Man Discovers Grandfather SBI Shares Worth 500 rupees Bought In 1994)

१९९४ मध्ये तन्मय यांच्या आजोबांनी ५०० रुपये किंमतीचे स्टॅट बँक ऑफ इंडियाचे काही शेअर्स खरेदी केले होते. आजोबांनी हे शेअर्स तसेच ठेवले होते, कोणाला विकले देखील नव्हते. शिवाय ते या शेअर्सबाबत विसरुन गेले होते. त्यामुळेच त्यांनी घरातील इतर सदस्यांना याची माहिती दिली नव्हती. पण, तन्मय यांना घरातील जुन्या वस्तूंमध्ये हा शेअर्सचा खजिना सापडला आहे.

१९९४ साली खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत आता चांगलीच वाढली आहे. डॉक्टर तन्मय यांनीच दिलेल्या माहितीनुसार, या शेअर्सची एकूण किंमत सध्या ३.७५ लाख रुपये आहे. याचाच अर्थ त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत तब्बल ७५० पटींनी वाढली आहे. इक्विटीमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक किती लाभदायक ठरु शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

डॉक्टर तन्मय यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की, माझ्या आजोबांनी १९९४ मध्ये पाचशे रुपयांचे एसबीआयचे शेअर्स खरेदी केले होते. ते याबाबत विसरले होते. त्यांनी शेअर्स का खरेदी केले होते आणि त्यांनी ते तसेच का ठेवले याबाबत त्यांना आठवत नाही. मला घरातील काही वस्तू शोधताना हे शेअर्स सापडले.

डॉक्टर पुढे म्हणतात की, 'अनेकजण मला विचारत होते की, या शेअर्सची किंमत आता किती झाली आहे. आता या शेअर्सची किंमत जवळपास, लाभांश (dividends) वगळून ३.७५ लाख इतकी आहे. ही काही मोठी रक्कम नाही. पण, गेल्या तीस वर्षांत या शेअर्संची किंमत ७५० पटींनी वाढली आहे.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

Who is Dhangekar?: ‘धंगेकर कोण?, मी किंमत देत नाही’, उदय सामंत चिडले..

कराड-मलकापूर मार्गावर CNG गॅस गळती, वाहतूक खोळंबली.. नेमकं काय घडलं?

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

SCROLL FOR NEXT