defense budget nirmala sitharaman 
Sakal Money

Budget 2024: संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ; जीडीपीच्या 3.4 टक्के करण्यात येणार खर्च

मोदी सरकारकडून संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण बजेट ११.१ टक्कांनी वाढवल्याचं सांगितलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मोदी सरकारकडून संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण बजेट ११.१ टक्कांनी वाढवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता संरक्षण बजेट ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये झाला आहे. जो जीडीपीच्या ३.४ टक्के असेल. (nirmala sitharaman budget 2024 Big increase in defense budget The expenditure will be 3 Point 4 percent of GDP)

जगभरात युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. हमास-इस्राईल युद्ध मागच्या वर्षी सुरु झालं आहे. लाल समुद्रामध्ये हुथी बंडखोरांच्या कारवाई वाढल्या आहेत. भारत आणि चीनमधील तणाव अद्याप कामय आहे. अशा परिस्थितीत संरक्षण बजेटमध्ये वाढ अपेक्षित होती. हीच गोष्टी लक्षात घेऊन २०२४-२५ चे बजेट सादर करण्यात आले.

मेक इन इंडिया योजनेंतर्गत शस्त्र निर्मितीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये वाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. गेल्या काही वर्षांमध्ये स्वदेश शस्त्र निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. संरक्षण वस्तूंची आयात कमी करुन निर्यात वाढवणे हे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. येत्या काळात संरक्षण शस्त्रास्त्रांबाबत स्वंयपूर्ण होण्याच्या दृष्टीने भारत पाऊल टाकत आहे.

सरकारने संरक्षण बजेटसाठी ६.२ लाख कोटी रुपये दिले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत तो ०.२७ लाख कोटी जास्त आहे. सरकारने मागच्या वर्षी संऱक्षण क्षेत्रासाठी ५.९३ लाख कोटी रुपये दिले होते. २०२४-२५ च्या एकूण बजेटपैकी ८ टक्के संरक्षण क्षेत्रावर खर्च करण्यात आला आहे.त्यामुळे ही टक्केवारी मोठी असल्याचं मानलं जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Rainfall Record Scam : पावसाच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करून 15 कोटींचे नुकसान? माजी खासदाराच्या 'त्या' आरोपाने कृषी विभागात खळबळ, 'स्कायमेट'ला धाडली नोटीस

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे 'रौद्र रूप' पाहून सारेच चक्रावले; वादग्रस्त निकालावर भडकला, अम्पायरला भिडला, नेमकं काय घडलं?

TCS Company Case : निदा खानच्या कुटुंबीयांची चौकशी; संशयितांना मदतप्रकरणी ‘बडा नेता’ही चौकशीच्या रडारवर

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

Indapur GP Reservation Draw: इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत १२ जूनला; आगामी निवडणुकांचे बिगुल

SCROLL FOR NEXT