show-cause notice to Ola Electric 
Sakal Money

Ola Electric : 'ओला इलेक्ट्रिक'च्या अडचणी वाढणार! अखेर केंद्र सरकारची कंपनीला नोटीस, १५ दिवसात मागितले उत्तर

Ola Electric markets news : केंद्र सरकारने ओला इलेक्ट्रिकविरोधात करण्यात येत असलेल्या हजारो तक्रारीनंतर तक्रारीनंतर कंपनीला शो-कॉज नोटिस जारी केली आहे.

रोहित कणसे

केंद्र सरकारने ओला इलेक्ट्रिकविरोधात करण्यात येत असलेल्या हजारो तक्रारीनंतर तक्रारीनंतर कंपनीला शो-कॉज नोटिस जारी केली आहे. सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) ने ग्राहकांकडून हजारोंच्या संख्येने तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे. ही नोटीस ३ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये दावा केला आहे की, ओलाने सेवेत कमतरता, चुकीच्या जाहिराती, चुकीच्या ट्रेड प्रॅक्टिस आणि कंज्यूमर राइट्सचे उल्लंघन केले आहे. ओलाला या नोटिशीला १५ दिवसांच्या आता उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

ओला इलेक्ट्रिक कंपनीला आपल्या सेवांमध्ये समस्या असल्याने खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. यातच कॉमेडियन कुणाल कामरा आणि ओला संस्थापक भाविश अग्रवाल यांच्यात सोशल मीडिवर सुरू असलेला वाद देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कुणाल आणि भाविश अग्रवाल यांच्यात एक्सवर शाब्दिक चकमक झाली होती, ज्यामध्ये ऑलाच्या मालकाने कुणाल कामराला सर्व्हिस सेंटरमध्ये येऊन जॉब जॉइन करण्याची ऑफर देखील दिली होती.

ग्राहक व्यवहार विभागाद्वारे संचालित राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने एक सप्टेंबर २०२३ ते ३० ऑगस्ट २०२४ च्या दरम्यानच्या ओला के ई स्कूटर्स संबंधित १०,६४४ तक्रारी दाखल केल्या आहेतयापैकी ३,३८९ प्रकरणात सेवा देण्यात उशीर , १,८९९ डिलीव्हरी करण्यात उशीर आणि १,४५९ सर्व्हिससंबधी आश्वासन पूर्ण न करण्यासंबंधी आहेत.

या तक्रारींमध्ये कंपनीच्या उत्पादनांमधील कमतरात, सेकंड हँड स्कूटरची विक्री, रद्द केलेल्या बुकिंगसाठीचा रिफंड कमी देणे, सर्व्हिसिंग नंतर लगेच समस्या येणे, ओव्हरचार्जिंग, बिलिंगमध्ये गडबड आणि बॅटरी संबंधी समस्या यासारख्या गंभीर मुद्द्यांवर जोर देण्यात आला होता.

ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले की सीसीपीए ओला इलेक्ट्रिकविरोधात अनेक तक्रारींची चौकशी करत आहे. ज्या खासकरून खराब सेवेसंबंधी आहेत. त्यांनी सांगितले की आम्ही आशा करतो की, कंपनी या सस्यांवर लवकरच सोडवेल.

तसेच ओला इलेक्ट्रिकने या प्रकरणी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही, वाद आणि चौकशीच्या रम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ९ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT