gold investment Sakal
Personal Finance

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीत मिळतोय १३ टक्के परतावा; गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

Gold Price: जगभरात वस्तूंच्या (कमोडिटी) चढ्या किंमती आणि वाढीव व्याजदराचा ग्राहकांना गेल्या वर्षी सामना करावा लागल्याने सुरक्षित गुंतवणूक आणि महागाईविरुद्ध योग्य बचाव म्हणून सोन्याने तारले. २०२४ मध्येही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगभरात वस्तूंच्या (कमोडिटी) चढ्या किंमती आणि वाढीव व्याजदराचा ग्राहकांना गेल्या वर्षी सामना करावा लागल्याने सुरक्षित गुंतवणूक आणि महागाईविरुद्ध योग्य बचाव म्हणून सोन्याने तारले. २०२४ मध्येही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कच्चे तेल, रिअल इस्टेट, रोखे आणि बँक ठेवींसह पर्यायी मालमत्ता वर्गांच्या तुलनेत सोन्यातील गुंतवणुकीतून २०२४ मध्ये चांगला परतावा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जागतिक आर्थिक मंदीच्या काळात सोने हीच सर्वांत मोठी आर्थिक सुरक्षा असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिका आणि चीनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांना कोरोना साथीपूर्व पातळीचा विकासदर गाठण्यात विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

त्यांच्या भविष्यातील वाढीसाठी सोने ही सर्वांत मोठी हमी ठरली आहे. आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार यंदा सोने खरेदी करत आहेत. गेल्या २० वर्षांत सोन्याने ११ टक्क्यांहून अधिक परतावा दिल्याने ते सोन्याबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवत गुंतवणूक करीत आहेत.

गेल्या वर्षात सोने ६४,४६० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आणि २०२३ मध्ये इतर मालमत्ता वर्गांना मागे टाकले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डने २०८१ डॉलर प्रतिऔंसचा उच्चांक गाठला. यावरून ग्राहकांची सोन्याची भूक वाढत असल्याचे दिसून येते.

खात्रीशीर उत्पन्न आणि चांगल्या परताव्यासाठी सोने खरेदी नेहमीच शहाणपणाची असते. जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम राहिल्यास २०२४ मध्ये सोने निश्चितच उच्चपातळीवर पोहोचेल, असा अंदाज ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) चेअरमन सैयम मेहरा यांनी व्यक्त केला.

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेश रोकडे यांनी २०२३ मध्ये सोन्याच्या परताव्याचे कौतुक केले आणि २०२४ मध्येही हा ट्रेंड कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अमेरिकेचे बँकिंग संकट, चीनमधील रिअल इस्टेटचा धोका, युक्रेनचे प्रदीर्घ युद्ध आणि मध्य-पूर्वेतील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याविषयीचा विश्वास वाढला आहे. आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- राजेश रोकडे, उपाध्यक्ष, जीजेसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT