16600 crore to be raised by Adani Enterprises Board of Directors approves QIP scheme Sakal
Personal Finance

Adani : अदानी एंटरप्रायझेस उभारणार १६,६०० कोटी; ‘क्यूआयपी’ योजनेला संचालक मंडळाची मंजुरी

‘क्यूआयपी’ अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांना शेअर पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तनीय रोखे किंवा इतर सिक्युरिटीज पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (क्यूआयबी) शेअरमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट अर्थात ‘क्यूआयपी’च्या माध्यमातून १६,६०० कोटी रुपये उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कंपनीने आज शेअर बाजाराला ही माहिती दिली.

‘क्यूआयपी’ अंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांना शेअर पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तनीय रोखे किंवा इतर सिक्युरिटीज पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (क्यूआयबी) शेअरमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देते. कंपनीच्या २४ जून रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी आणि इतर नियामक संमतींसह, आवश्यक मंजुरी मिळण्यावर हा निर्णय अवलंबून आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

अदानी एनर्जी सोल्युशन्सने ‘क्यूआयपी’ किंवा इतर मान्यताप्राप्त पर्यायांद्वारे १२,५०० कोटी रुपये उभारण्याची योजना जाहीर केली आहे. या निधी उभारणीच्या घोषणेनंतर, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ‘बीएसई’वर ३२९५ रुपयांवर व्यवहार करत होते. या शेअरने आता गेल्या वर्षी हिंडेनबर्ग संकटामुळे झालेले जवळजवळ सर्व नुकसान भरून काढले आहे. अदानी समूह युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवरील सेवेच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचा विचार करत असून, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे ऑनलाइन खरेदी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT