22nd Annual Awards Ceremony of the Deccan Chamber of Commerce, Industries and Agriculture (DCCIA) Sakal
Personal Finance

‘डेक्कन चेंबर’तर्फे उद्योजकांचा सन्मान ; इंदर जैन यांना जीवनगौरव, दिया गरवारे सर्वोत्कृष्ट उद्योजिका

डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अर्थात ‘डीसीसीआयए’चा २२ वा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच येथे पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अर्थात ‘डीसीसीआयए’चा २२ वा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच येथे पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स लि.चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर उपस्थित होते.

‘डीसीसीआयए’चे अध्यक्ष रथिन सिन्हा, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तवा, सचिव व्ही. एल. मालू, खजिनदार प्रकाश धोका आदी मान्यवर उपस्थित होते. देशातील सर्वांत मोठे पॉलिमर कम्पाउंड निर्मात्या कंपनीचे संस्थापक संचालक इंदर जैन यांना संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उद्योजिका दिया गरवारे इबानेज यांना सर्वोत्कृष्ट उद्योजिका पुरस्काराने, तर रिअर अॅडमिरल पुरुषोत्तम शर्मा यांना उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अॅडमिरल शर्मा यांनी सुरक्षित भारत उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांचे प्राण वाचविले आहेत. बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस पुरस्कार विका इन्स्ट्रुमेंटस कंपनीला, तर बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस पुरस्कार आयटीसी कंपनीला प्रदान करण्यात आला.

‘‘कोणत्याही क्षेत्रातील समृद्धीची संकल्पना ही आर्थिक नफ्यापेक्षा खूप पुढे आहे. उद्योजकांनी समाजाच्या, देशाच्या कल्याणामध्ये भरीव योगदान देणारे उपक्रम हाती घ्यावेत,’’ असे आवाहन संजय किर्लोस्कर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT