Vedanta ltd Sakal
Personal Finance

Vedanta ltd : वेदांत लिमिटेडच्या शेअर्समध्ये 36% तेजी, एक्सपर्ट्सकडून टारगेटमध्ये वाढ...

वेदांत लिमिटेडचे (Vedanta ltd) शेअर्स सध्या तेजीत आहेत. वेदांतचे शेअर्स आणखी 36 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असा विश्वास सध्या मार्केट एक्सपर्ट्स आणि ब्रोकरेज फर्म व्यक्त करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वेदांत लिमिटेडचे (Vedanta ltd) शेअर्स सध्या तेजीत आहेत. वेदांतचे शेअर्स आणखी 36 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असा विश्वास सध्या मार्केट एक्सपर्ट्स आणि ब्रोकरेज फर्म व्यक्त करत आहेत. नुकतेच कंपनीने मार्च 2024 आणि आर्थिक वर्ष 2024 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते.

यानंतर ब्रोकरेजने शेअरची टारगेट प्राईस वाढवली आहे. वेदांत लिमिटेडच्या शेअर्समध्ये नुकतीच सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आणि तो 402.95 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 1.47 लाख कोटीवर पोहोचले आहे.

मार्च 2024 च्या तिमाहीत वेदांताचा कंसोलिडेटेड महसूल 34,937 कोटी होता, जो वार्षिक तुलनेत 6 टक्क्यांनी कमी आहे. एका वर्षापूर्वी, मार्च 2023 तिमाहीत, कंपनीचा महसूल 37,225 कोटी होता.

मार्च 2024 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 27 टक्क्यांनी घसरून 2,273 कोटीवर आला आहे. एका वर्षापूर्वी तो 3,132 कोटी होते. मार्च 2024 च्या तिमाहीत एकत्रित EBITDA 8,969 कोटी रुपये होता असे वेदांताने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.

कोटकने वेदांतच्या स्टॉकवर 'सेल' रेटिंग कायम ठेवली आहे पण टारगेट प्राइस 255 रुपयांवरून 320 रुपये प्रति शेअर केली आहे. तर मार्केट एक्सपर्ट्सवे आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 साठी कंसोलिडेटेड EBITDA अंदाजे 14% आणि 17% ने वाढवले आहेत.

येत्या काळातील ॲल्युमिनियम आणि झिंकच्या किमतींचा अंदाज लक्षात घेऊन हे केले गेले आहे. मोतीलाल ओसवाल यांनी आर्थिक वर्ष 2026 साठी वेदांतासाठी EBITDA अंदाज 4% वाढवला आहे. ब्रोकरेजने स्टॉकवर 'न्यूट्रल' कॉल कायम ठेवला आणि टारगेट 360 रुपये प्रति शेअर केली.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cylinder Blast : कोल्हापुरातील राजारामपुरी हादरली; घराला लागलेल्या भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट झाला अन्

ऑक्सफर्डनं मागितली उदयनराजेंची माफी, जेम्स लेनच्या पुस्तकात पडताळणी न करता मजकूर छापल्याचं केलं मान्य

Latest Marathi News Live Update : रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य खेदजनक - प्रतिभा धानोरकर

Steve Smith ची गाडीही सुस्साट...! शतक ठोकत द्रविडला टाकलं मागे; Ashes मध्ये फक्त ब्रॅडमनच पुढे

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'चा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- एकच विनंती आहे...

SCROLL FOR NEXT