40 per cent of Indian employees are considering quitting their jobs because of work technology holding back productivity  Sakal
Personal Finance

Job Cut: कंपन्यांमधील खराब तंत्रज्ञानामुळे 40 टक्के भारतीय कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत

Job Cut: बहुसंख्य कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांच्या कंपन्यांनी जनरेटिव्ह एआयचा वापर करावा.

राहुल शेळके

Job Cut: खराब तंत्रज्ञानामुळे सुमारे 40 टक्के भारतीय कर्मचारी पुढील सहा महिन्यांत नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत कारण खराब तंत्रज्ञानामुळे उत्पादकता कमी झाली आहे, असे एका नवीन अहवालात उघड झाले.

सॉफ्टवेअर प्रमुख Adobe च्या अहवालानुसार जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा विचार केला जातो, तेव्हा सुमारे 98 टक्के भारतीय कामगारांनी जनरेटिव्ह एआय उपयुक्त असल्याचे सांगितले आणि 94 टक्के लोकांनी ऑटोमेशनबद्दलही असेच म्हटले आहे. बहुसंख्य कामगारांना वाटते की त्यांच्या कंपन्यांनी जनरेटिव्ह एआयचा वापर करावा.

या अहवालात संचालक किंवा त्याहून अधिक वरिष्ठ पदावरील 626 मॅनेजर आणि 1,385 कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

"ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काम प्रभावी होते हे आपण नाकारु शकत नाही, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पारंपारिक कामाच्या पद्धतीत क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे," असे Adobe India मधील डिजिटल मीडिया व्यवसायाचे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख गिरीश बालचंद्रन म्हणाले.

डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत असूनही, अनेक कामाच्या ठिकाणी कागदावर आधारित कामाचा वापर करत आहेत. 10 पैकी 5 पेक्षा जास्त कामगार म्हणतात की त्यांचे किमान अर्धे काम कागदावर आधारित आहे, तर बाकीचे कामगार म्हणतात की ते पूर्णपणे पेपरलेस काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT