7th Pay Commission Central Employees  Sakal
Personal Finance

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट; DA नंतर आता वाढली ग्रॅच्युइटीची मर्यादा

7th Pay Commission: महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या दुरुस्तीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 25टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.

राहुल शेळके

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. डीएमध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के केला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर इतर भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे.

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या दुरुस्तीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 25टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत 25 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे.

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. 30 मे रोजी, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व मंत्रालयांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमधील सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याची विनंती केली आहे.

सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 20 लाखांवरून 25 लाख रुपये

केंद्र सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी 25 टक्क्यांनी वाढवली आहे. या वाढीनंतर ग्रॅच्युइटी 20 लाखांवरून 25 लाख रुपये झाली आहे. सरकारने मार्च 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर डीए 50 टक्क्यांवर पोहोचला होता. डीए 50 टक्क्यांनी कमी केल्यानंतर अनेक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढले आहेत.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

नोकरदार लोकांना ग्रॅच्युइटी दिली जाते. कंपनीत किमान पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सतत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी दिली जाते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 नुसार, ही रक्कम त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर दिली जाते. ही रक्कम मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याने किमान पाच वर्षे संस्थेत सतत काम करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT