Central Govt Employees Sakal
Personal Finance

7th Pay Commission: 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दोन वर्ष मिळणार पगारी सुट्टी

7th Pay Commission Latest News: कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवेदरम्यान रजेच्या पहिल्या 365 दिवसांसाठी पूर्ण पगार दिला जाईल.

राहुल शेळके

7th Pay Commission Latest News: केंद्र सरकारने अखिल भारतीय सेवेच्या (AIS) पात्र सदस्यांसाठीच्या सुट्यांबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत आता हे कर्मचारी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दोन वर्षांची पगारी रजा घेऊ शकतात. ही रजा दोन मुलांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त 2 वर्षांसाठी सरकारकडून दिली जाईल.

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग (DoPT) ने अलीकडेच एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना 28 जुलै रोजी जारी करण्यात आली. या अंतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करून अखिल भारतीय सेवा मुलांची रजा नियम 1995 मध्ये सुधारणा केली आहे. AIS कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते.

2 मुलांची काळजी घेण्यासाठी 730 दिवसांची रजा

अखिल भारतीय सेवा (AIS) च्या महिला किंवा पुरुष सदस्याला दोन मुलांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण सेवेदरम्यान 730 दिवसांची सुट्टी दिली जाईल. पालकत्व, शिक्षण, आजारी आणि तत्सम काळजी या कारणास्तव मुलाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ही रजा दिली जाऊ शकते.

रजेदरम्यान किती पैसे मिळतील?

चाइल्ड केअर लीव्ह अंतर्गत, कर्मचाऱ्याला संपूर्ण सेवेदरम्यान रजेच्या पहिल्या 365 दिवसांसाठी 100% पगार दिला जाईल. तर दुसऱ्या 365 दिवसांच्या रजेवर 80 टक्के पगार मिळणार आहे.

अधिसूचनेनुसार, चिल्ड्रेन लीव्ह खाते इतर सुट्ट्यांमध्ये एकत्रीत केले जाणार नाही. या अंतर्गत, एक स्वतंत्र खाते असेल, जे कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT