Investment  sakal
Personal Finance

Investment : राज्यात येणार ८१ हजार कोटींची गुंतवणूक ; इलेक्ट्रिक वाहने, लिथियम बॅटरी, सेमी कंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

राज्यात ८१, १३७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात ८१, १३७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती या प्रकल्पांचा समावेश असून कोकणासह मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा उद्योग विभागाने केला आहे.

सह्याद्री अतिथिगृहात आज झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, ‘‘राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत विविध प्रोत्साहने जाहीर करण्यात आलेली आहेत. आजच्या बैठकीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम आयन सेल/बॅटरी, इलेक्ट्रिक गाड्या, सेमी कंडक्टर चिप, सोलर पीव्ही मॉड्युल आणि इलेक्ट्रोलायझर, फळांचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.’’ सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प प्रथमच महाराष्ट्रात येत असून तो दोन टप्प्यांत होणार आहे.

याप्रकल्पांची माहिती अशी

लिथियम बॅटरी निर्मिती

कंपनी : जेएसडब्लू एनर्जी पीएसपी इलेव्हन

ठिकाण : नागपूर

गुंतवणूक : २५ हजार कोटी

रोजगारनिर्मिती : ५००० पेक्षा अधिक

सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर (एकात्मिक)

कंपनी : आवाडा इलेक्ट्रो

ठिकाण : एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल जि. रायगड

गुंतवणूक : १३ हजार ६४७ कोटी

रोजगारनिर्मिती : ८००० पेक्षा अधिक

पल्प निर्मिती

कंपनी : हिंदुस्तान कोका कोला बिव्हरेज

ठिकाण : रत्नागिरी

गुंतवणूक : १५०० कोटी

इलेक्ट्रिक आणि

हायब्रीड वाहन निर्मिती

कंपनी : जेएसडब्लू ग्रीन मोबिलिटी

ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

गुंतवणूक : २७ हजार २०० कोटी

रोजगारनिर्मिती : ५२०० पेक्षा अधिक

मद्यार्क निर्मिती

कंपनी : परनॉर्ड रिकार्ड इंडिया

ठिकाण : अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर

गुंतवणूक : १७८५ कोटी

सेमीकंडक्टर चिप निर्मिती एकात्मिक प्रकल्प

कंपनी : आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स

ठिकाण : तळोजा/पनवेल, जि. रायगड/पुणे/उर्वरित महाराष्ट्र

गुंतवणूक : १२ हजार कोटी

(पहिला टप्पा)

रोजगारनिर्मिती : ४००० पेक्षा अधिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT