Bank of Maharashtra  sakal
Personal Finance

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून ८५७ कोटींचा लाभांश

बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या रु. ८५७.१६ कोटी रकमेच्या लाभांशाचा धनादेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे नुकताच सादर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या रु. ८५७.१६ कोटी रकमेच्या लाभांशाचा धनादेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे नुकताच सादर करण्यात आला.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना यांनी अर्थमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्त केला. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे आणि एनबीसीए व्हर्टिकल प्रभारी संतोष दुलार यांच्यासह केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२४ साठी प्रत्येक समभागामागे रु. १.४० (१४ टक्के) लाभांश जाहीर केला होता. या लाभांशामुळे गेल्या आर्थिक वर्षातील बँक ऑफ महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी प्रतिबिंबित होते.

२०२३ मधील रु. २६०२ कोटींच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत २०२४ मध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात ५५.८४ टक्के वाढ होऊन तो रु. ४०५५ कोटींवर पोचला. महाबँक सातत्याने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करीत असून, एकूण व्यवसाय व ठेव संकलनात बँकेने सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. २०२३-२४ मध्ये बँकेने आपल्या एकूण व्यवसायात १५.९४ टक्के, तर ठेव संकलनात १५.६६ टक्के वाढ नोंदविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT