Piccadily Agro Industries  sakal
Personal Finance

Piccadily Agro Industries : 4 वर्षात 1 लाखाचे 96 लाख, शेअरचा 9500% बंपर परतावा...

Piccadily Agro Industries Stock Analysis : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमादार परतावा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमादार परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज ( Piccadily Agro Industries), ज्याने अवघ्या 6 महिन्यांत त्यांच्या शेअरहोल्डर्सचे पैसे दुप्पट केले.या कंपनीने 5 वर्षात 9500 टक्के परतावा दिला आहे.

पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज 1994 मध्ये नावारुपाला आली, पण त्याची स्थापना 1953 मध्ये दारू डिस्ट्रीब्यूशन व्यवसायातून झाली. पिकाडिली ब्रँड नाव 1967 मध्ये अस्तित्वात आले. ही कंपनी सध्या भारतातील माल्ट स्पिरीटची सर्वात मोठी स्वतंत्र उत्पादक आणि विक्रेती आहे. ती इथेनॉल, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA), CO2 आणि व्हाईट क्रिस्टल शुगरचे उत्पादन करते. त्याच्या उत्पादनांमध्ये इंद्री ब्रँड नावाखाली सिंगल मॉल्ट व्हिस्की, कॅमिकारा ब्रँड नावाखाली केन जूस रम, तसेच व्हिस्लर आणि रॉयल हायलँड ब्रँड नावाखाली ब्लेंडेड मॉल्ट व्हिस्की यांचा समावेश आहे.

बीएसई डेटानुसार, 5 वर्षांपूर्वी 20 सप्टेंबर 2019 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 8.05 रुपये होती. सध्या बीएसईवर हा शेअर 772.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशाप्रकारे गेल्या 5 वर्षात शेअरची किंमत 9500 टक्क्यांनी वाढली आहे. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर 9 लाख 60 हजार झाली असती. त्याचप्रमाणे, 50 हजारांची गुंतवणूक 48 लाख आणि 1 लाखाची गुंतवणूक 96 लाख झाली असती.

कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 7300 कोटी आहे. शेअरचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. जून 2024 अखेरपर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीत 70.97 टक्के हिस्सा होता. गेल्या 6 महिन्यांत शेअरची किंमत 156 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. वर्षभरात किंमत 650 टक्क्यांनी वाढली आहे. 2 वर्षात 1918 टक्के परतावा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीचा कंसोलिडेटेड रेवेन्यू 828.12 कोटी आणि निव्वळ नफा 110.37 कोटी नोंदवला गेला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT