Aadhaar card removed from document list for update or correction, no longer valid date of birth proof  Sakal
Personal Finance

Aadhaar Card: EPFOने घेतला मोठा निर्णय; आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही

Aadhaar Card: EPFO ने आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने आधार कार्ड वैध कागदपत्रांच्या यादीतून वगळले आहे. या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकही जारी केले आहे. श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या EPFO ​​ने सांगितले की, आधार कार्ड वापरून जन्मतारीख बदलता येणार नाही.

राहुल शेळके

Aadhaar Card: EPFOने आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने आधार कार्ड वैध कागदपत्रांच्या यादीतून वगळले आहे. या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकही जारी केले आहे.

श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या EPFO​ने सांगितले की, आधार कार्ड वापरून जन्मतारीख बदलता येणार नाही. ईपीएफओने 16 जानेवारीला हे परिपत्रक जारी केले. त्यानुसार UIDAI कडून एक पत्रही प्राप्त झाले आहे.

जन्मतारीख बदलल्यास आधार कार्ड वैध राहणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्ड वैध कागदपत्रांच्या यादीतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ईपीएफओचे परिपत्रक

कोणती कागदपत्रे वैध असतील?

ईपीएफओनुसार, बर्थ सर्टिफिकेटच्या मदतीने तुम्ही जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्त करू शकता. याशिवाय कोणत्याही सरकारी मंडळाची किंवा विद्यापीठाची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, शाळा बदल्याचा दाखलाही या यादीत ठेवण्यात आला आहे.

या सर्व कागदपत्रांमध्ये नाव आणि जन्मतारीख असणे आवश्यक आहे. याशिवाय, सिव्हिल सर्जनने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन क्रमांक, सरकारी पेन्शन आणि मेडिक्लेम प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र देखील अपडेट/दुरुस्तीसाठी वैध असेल.

आधार कार्डचा वापर कुठे आणि कसा केला जाईल?

UIDAI ने स्पष्ट केले आहे की आधार कार्डचा वापर ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा म्हणून केला जावा. परंतु, जन्म प्रमाणपत्र म्हणून त्याचा वापर योग्य नाही.

आधार हे 12 अंकी ओळखपत्र आहे. तुमच्या ओळखीचा आणि देशातील कायमस्वरूपी वास्तव्याचा पुरावा म्हणून आधार वैध आहे. मात्र, आधारमध्ये जन्मतारीख आहे. पण त्याचा जन्म प्रमाणपत्र म्हणून वापर करता येणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयानेही दिला होता निर्णय

अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विरुद्ध UIDAI आणि इतर प्रकरणांमध्ये असे म्हटले होते की, आधार क्रमांक जन्म प्रमाणपत्र म्हणून नव्हे तर ओळखपत्र म्हणून वापरला जावा. यानंतर UIDAI ने एक परिपत्रक जारी करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Latest Maharashtra News Updates Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार या सिंहाचा आणि अजित पवार या वाघांचा वारसा सांगणारा-आमदार अमोल मिटकरी

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Sunset Destinations: 'Sunset Lovers' साठी भारतातील हे 4 हॉटस्पॉट्स, एकदा नक्की भेट द्या!

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरणे पडले महागात, महिलेने चोराला शिकवली 'अशी' अद्दल, व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT