Adani Family Plans 1 Billion dollar Investment Into Green Energy Unit  Sakal
Personal Finance

Adani Group: अदानी कुटुंब 'या' व्यवसायात करणार 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक! शेअर्समध्ये तुफान वाढ

Adani Group: कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला आठ बँकांकडून कर्ज घेतले होते.

राहुल शेळके

Adani Group: गौतम अदानी कुटुंब नवीन वर्षात व्यवसाय विस्तारासाठी नवीन योजनेवर काम करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गौतम अदानी अक्षय ऊर्जा युनिटमध्ये 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.

याद्वारे, व्यवसायाच्या विस्तारावर आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. मात्र, अदानी समूहाच्या प्रतिनिधीने या गुंतवणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जीने निधी उभारण्याच्या आपल्या योजनेची माहिती दिली आहे. अदानी ग्रीनच्या संचालक मंडळाची बैठक 26 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती कंपनीने बीएसईला दिली आहे.

या बैठकीत इतर बाबींबरोबरच निधी उभारणीचा विचार करून त्याला मंजुरी दिली जाणार आहे. 2030 पर्यंत 45 गिगावॅट ग्रीन एनर्जी क्षमता निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला आठ बँकांकडून कर्जही घेतले होते.

अदानी ग्रीनचे शेअर्स

गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या सत्रात अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 4.69% च्या वाढीसह 1519.85 रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान शेअरचा भाव 1549.40 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 2,40,749.18 कोटींवर पोहचले आहे.

जानेवारी महिन्यात अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनेक महिने अदानी समूहावर संकटाचे ढग दाटून आले.

या संकटामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांना एकावेळी 150 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागले. या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी अदानी समूहाने विविध आघाड्यांवर अनेक प्रयत्न केले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT