Adani Group  Sakal
Personal Finance

Gautam Adani: गौतम अदानींना आणखी एक धक्का, आणखी एक मोठा आरोप, काय आहे प्रकरण?

Gautam Adani: अदानी समूहाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

राहुल शेळके

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अदानी समूहाने गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा एका मीडिया समूहाच्या अहवालात करण्यात आला आहे.

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCRP) ने हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शियल टाइम्सला शेअर केला आहे. यामध्ये पहिल्यांदाच अदानी समूहाने मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यानुसार 2013 ते 2018 या कालावधीत समूह कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले. नॉन-प्रॉफिट मीडिया ऑर्गनायझेशन OCCRP ने मॉरिशस आणि अदानी ग्रुपच्या अंतर्गत ईमेलद्वारे हे व्यवहार झाले असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या तपासात असे उघड झाले आहे की गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाचे शेअर्स खरेदी आणि विक्री केल्याची किमान दोन प्रकरणे आहेत.

OCCRP अहवालात गुरुवारी नसीर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग या दोन गुंतवणूकदारांची नावे आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की हे लोक अदानी कुटुंबाचे दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार आहेत आणि त्यांनी आपल्या अहवालात या दोघांची चौकशी केली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, OCCRP ने असा दावा केला आहे की चांग आणि अहली यांनी गुंतवलेले पैसे अदानी कुटुंबाने दिल्याचा कोणताही पुरावा नाही, परंतु अहवाल आणि कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले आहे की अदानी समूहात त्यांची गुंतवणूक आहे.

Adani Group Media Statement

अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारीमध्ये अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये अदानी समूहावर शेअरच्या किंमतीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अदानी समूहाने हे आरोप फेटाळले होते. त्यांनी नेहमीच नियमांचे पालन केल्याचे सांगितले.

परंतु या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि त्याचे मार्केट कॅप 150 बिलियन डॉलरने कमी झाले. मात्र, अलीकडच्या काळात समूहाचे शेअर्स वाढले आहेत.

हे आरोप बिनबुडाचे असून त्यांना कोणतेही पुरावे नाहीत. हिंडेनबर्गच्या अहवालातूनच हे आरोप करण्यात आले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करतात. यामध्ये सार्वजनिक शेअरहोल्डिंगशी संबंधित नियमांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT